जिल्ह्यात 28 हजार नवे मतदार

आगामी निवडणुकांसाठी नवमतदारांना संधी
जिल्ह्यात 28 हजार नवे मतदार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनातर्फे (District Administration) घेण्यात आलेल्या मतदारपुर्नरिक्षण (Voter re-examination) कार्यक्रमाअंतर्गत मतदार याद्या अद्ययावत (Voter lists updated) करण्यात आल्या. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात 28 हजार नवीन मतदारांची (new voters) भर पडली असून, आगामी निवडणुकांसाठी या नव मतदारांना पहिल्यांदाच मतदानाची संधी (Opportunity to vote) उपलब्ध होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारपुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. यात नवीन मतदार नोंदणी करणे, फोटो दुरुस्ती नावे व पत्त्यात बदल करणे, दुबार नावे वगळणे, ज्यांची छायाचित्रे नाहीत अशांची छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट करणे, यासारखी कामे करण्यात आली.

तसेच गावोगावी ग्रामसभा घेवून मतदार याद्यांचे वाचन करुन त्यात दुरुस्ती करण्यात आली. सन 2019 च्या तुलनेत 2022 मध्ये नव मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात तब्बल 28 हजार 111 नव मतदारांची नोंदणी झाली असून, त्यात 8 हजार 79 सैनिक मतदारांचा समावेश आहे.

अंतीम यादी नुसार जळगाव जिल्ह्यात 18 लाख 12 हजार 364 पुरुष, 16 लाख 68 हजार 715 महिला तर 94 तृतियपंथी मतदार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

मतदारसंघनिहाय असे आहेत मतदार

चोपडा- 163600 (पुरुष), 154762 (महिला), 4 (तृतियपंथी), रावेर- 153280 (पुरुष), 142881 (महिला), 0 (तृतियपंथी), भुसावळ- 162654 (पुरुष), 149094 (महिला), 27(तृतियपंथी), जळगाव शहर- 202459 (पुरुष), 182795 (महिला), 22 (तृतियपंथी), जळगाव ग्रामीण- 162929 (पुरुष), 149934 (महिला), 2 (तृतियपंथी), अमळनेर- 154636 (पुरुष), 143910 (महिला), 4 (तृतियपंथी), एरंडोल- 146650 (पुरुष), 136959 (महिला), 2 (तृतियपंथी), चाळीसगाव- 191292 (पुरुष), 170172 (महिला), 24 (तृतियपंथी), पाचोरा- 164247 (पुरुष), 151074 (महिला), 2 (तृतियपंथी), जामनेर- 161858 (पुरुष), 148380 (महिला), 6 (तृतियपंथी), मुक्ताईनगर- 148758 (पुरुष), 138754 (महिला), 1 (तृतियपंथी) असे एकूण 34 लाख 81 हजार 173 व 94 तृतियपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांसाठी उत्साह

जिल्ह्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मतदार करण्यासाठी नव मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे. जिल्हा परिषदेची अंतीम प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. आता, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com