किनगावात भरला 27 वर्षापुर्वीचा वर्ग अन सत्तरीतील शिक्षकांनी केले ज्ञानदान

किनगावात भरला 27 वर्षापुर्वीचा वर्ग अन सत्तरीतील शिक्षकांनी केले ज्ञानदान

अरूण पाटील । यावल Yaval

आजपासून बरोबर 27 वर्षापुर्वी (27 years ago) ते सारे एकाच वर्गात (class) बसून अध्यापनासह खट्याळपणा (Naughtiness with teaching) करत होते. शिक्षकही त्यांना रागावत तर कधी त्याच्या खट्याळपणात सहभागी होत. भांडणे होत पण त्यात रागाचा, व्देषाचा लवलेशही नसे. असेच दिवस भुर्रकन उडून गेले. दहावीच्या निरोप (Farewell to the tenth) समारंभानंतर जो तो करीअरच्या (Career) मार्गाने दूर झालेत. आणि बरोबर 27 वर्षानी पुन्हा हे सारे विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात त्याच बाकांवर स्थानापन्न झालेत. तर सत्तरीतील शिक्षकांनी (Teachers) पुन्हा या पन्नाशितील विद्यार्थ्यांना Students ज्ञानदान केले.

किनगावातील नेहरू विद्यालयात (Nehru Vidyalaya) आजचा दिवस जरा अद्भूतच होता. कारण तब्बल 27 वर्षापूर्वीचा वर्ग आज पुन्हा भरला होता. वयाची सत्तरी गाठलेले गुरूजन आणि पन्नाशीत असलेले पण शालेय गणवेशात नसलेले विद्यार्थी एका वर्गात बसले होते. निमित्त होते स्नेहमिलनाचे.

किनगाव ता. यावल येथील नेहरू विद्यालयातील 1994 मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी एकत्र येत स्नेह मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.बी. पाटील होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये शिक्षक पी. जी. पाटील, जी. एम. महाजन, आर. एस. सोनवणे, आर. एस. पाटील, ए. एफ. पाटील, पी. एन. सुरवाडे, एन. बी. मोरे, शिक्षीका सरोज पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या त्यावेळेच्या सर्व शिक्षक यांना एकत्र बोलावून विशेष म्हणजे त्यांच्या अर्धांगिनीचा देखील सत्कार केला.

सपत्नीक झालेल्या या सत्काराने उपस्थित शिक्षक भारावून गेले होते. तसेच या कार्यक्रमांमध्ये सैनिक जवान विजय धांडे, मधुकर ठाकूर, दीपक पाचपोळे, हुसेन तडवी यांना देखील सन्मीत करण्यात आले. तर अध्यक्षीय मनोगतात बोलतांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.बी. पाटील हे अतिशय भाऊक झाले.

नेहरू विद्यालयाचा 1994 चा इयत्ता 10 चा हा वर्ग मोठा झाला व सुसंस्कारी झाला आणी कायम आपल्या गुरुजनांशी ऋणानुबंध ठेवत अशा प्रकारे कार्यक्रम घेवुन आमचा सपत्नीक सन्मान केला तेव्हा विद्यार्थ्यांचा हा उपक्रम सेवानिवृत्त झालेल्या आम्हा सर्व शिक्षकांसाठी ऊर्जा देणारा आहे व आजही सत्तावीस वर्षांपूर्वीचे हे विद्यार्थी आमच्या समोर जणू शाळेच्या वर्गातच आहे असा भास आम्हाला होतो व यामुळे आमचं आयुष्य देखील आरोग्य संपन्न होत आहे असा मला वाटतं असे सांगून ते भावनिक झाले होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने अजित तडवी, विद्यार्थीनींच्या वतीने शीतल झांबरे -जावळे, दिलीप पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोना तसेच शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप सुरवाडे व शेवटी आभार नथ्थु महाजन यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समीर तडवी, वसंत सोनार, नितीन धांडे, शब्बीचर पटेल, मधूकर लोहार, मुकेश गुरव, धनराज तेली, पांडुरंग महाजन, प्रमोद पाटील, भावडू पाटील, जगदीश कोळी, विजय धांडे, उल्हास सिंगणूरकर, योगेश पाटील, टेनूराम चौधरी, सुनील बारी, प्रदीप महाजन, युवराज शिरसाडे, ज्योती भोलाने, ललिता पाटील, किर्ती चौधरी, राजश्री पाटील, भावना पाटील, वैशाली वराडे आदींनी परिश्रम घेतले.

माजी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून सेवा निवृत्त झालेल्या आम्हा सर्व शिक्षकांना आम्ही जणू आजही सेवा देत आहोत आणि ही मुलं आजही आमच्या समोर वर्गात आहेत असा भास होत आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते.

विद्यार्थ्यांच्या अशा उपक्रमामुळे आमचे आरोग्य अधिक सुदृढ होत आहे असे आम्हाला जाणवते असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील यांनी केले ते किनगावात 1994 मध्ये इयत्ता 10 वीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात विद्यार्थी - विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार केला. व मोठ्या उत्साहात मेळावा संपन्न झाला

गुरुजनांची शिकवण अंगीकारली

शालेय जीवनात गुरुजनांनी दिलेली शिकवण अंगीकृत करत आज आपल्या संसारात ती उपयोगी पडत आहे. आपल्या पाल्यांचे पालनपोषण करत असतांना त्यांना संस्कार सह आम्हास आमच्या गुरूजनांनी कशी शिवकन दिली हे आवर्जुन सांगत त्यांना शिकवत आहोत व गुरूजनांची शिकवन खूपच उपयोगी पडत आहे असे प्रसंगी मनोगतात शितल झांबरे - जावळे हिने सांगितले.

गुरुजनांचा आदर

विद्यार्थी म्हणून आजही गुरुजनांचा आम्ही आदर करतो. तसेच आम्हाला माध्यमिक शिक्षणात ज्या गुरुजनांनी शिक्षणासोबत संस्कार दिले ते खूपच महत्वाचे होते आणि त्यामुळेच आज आम्ही विविध क्षेत्रात आपले सक्षम रित्या करिअर करू शकलो असे प्रसंगी अजित तडवी या विद्यार्थ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com