२७ दुचाकी चोरणारा सराईत चोरटा अखेर जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
२७ दुचाकी चोरणारा सराईत चोरटा अखेर जेरबंद

जळगाव- Jalgaon

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या योगेश शिवाजी दाभाडे (रा. बळसाने ता.साक्री जि.धुळे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch team) धुळे शहरातून बुधवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २७ दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितावर जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हा दाखल आहेत.

जळगाव शहर, पारोळा आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीच्या घटना दिवसागणिक वाढू लागल्या आहेत. या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक तयार केले.

यात पोहेकॉ संदीप पाटील, पो.ना. प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोहेकॉ विजय चौधरी यांना गुन्ह्यातील आरोपींच्या शोधकामी सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बुधवारी धुळ्यातून संशयीत योगेश शिवाजी दाभाडे याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पारोळा शहरातून चोरल्याची कबुली दिली.

चोरीच्या २७ दुचाकी हस्तगत

सराईत चोरटा योगेश दाभाडे याच्यावर जळगाव शहर, पारोळा, अमळनेरसह धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या संशयित आरोपीकडून तब्बल २७ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com