जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी २७ कोटींचा निधी मंजूर!

जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी २७ कोटींचा निधी मंजूर!

जळगाव - प्रतिनिधी jalgaon

जिल्हा वार्षिक योजनेतर्गत म्हणजे (dpdc) डीपीडीसीच्या माध्यमातून जनसुविधा योजनेमधून अंतिम सुधारित तरतुदी द्वारे जिल्ह्यात १२४ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) इमारत बांधकामासाठी (Building construction) तब्बल २७ कोटी २८ लक्ष निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आला असून त्यामुळे जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींना आता हक्काचे फर्निचरसह सुसज्ज अशी इमारत उभारली जाणार आहे.

एका ग्रामपंचायतीसाठी २२ लक्ष निधी मंजूर केला असून जिल्हा परिषदेचे (Chief Executive Officer Dr. Pankaj Asia) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी नुकतीच जिल्ह्यातील १२४ ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी यासाठी ९० टक्के निधी म्हणजे २३ कोटी ५६ लक्ष निधी जिल्हा परिषदेकडे वितरित केला असून लवकरच १२४ ग्रामपंचायतीच्या इमारती सुसज्ज होणार असून कार्यन्वित होणार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय गावाच्या सर्वांगीण उन्नतीकरीता दिशादर्शक ठरावे अशी अपेक्षा ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत हा कोणत्याही गावाचा प्रशासकीय आत्मा असतो. जिल्ह्यातील बर्‍याचशा ग्रामपंचायतीच्या वास्तू या जुन्या झाल्या असून काही तर अगदी मोडकळीस आलेल्या आहेत. नेमकी याच समस्येची दखल घेऊन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय उभारण्याचा पॅटर्न अंमलात आणला आहे.

याच कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आता जिल्ह्यातील तब्बल १२४ गावांना फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय मिळणार आहे. या कामांसाठी तब्बल तब्बल २७ कोटी २८ लक्ष रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून तात्काळ २३ कोटी ५६ लक्ष निधी जिल्हा परिषदेला वितरिक केल्यामुळे ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.

असे असेल प्रत्येक नवीन ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालयातूनच गावाचा कारभार पाहिला जातो. या पार्श्‍वभूमिवर, नव्याने बांधण्यात येणार्‍या ग्रामपंचायतीत सुसज्ज सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना बसण्यासाठी कार्यालय करण्यात येईल. यासोबत ग्रामपंचायतीच्या विविध बैठकींसाठी सभागृहाची तरतूद देखील असेल. तर याला लागूनच प्रसाधन गृह देखील उभारण्यात येणार आहे. परिणामी गाव कारभार्‍यांची व ग्रामस्थांची नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे चांगलीच सोय होणार आहे.

तालुका निहाय अश्या आहेत मंजूर ग्रामपंचायत कार्यालय!

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये १२४ ग्रामपंचायतीसाठी फर्निचरसह तब्बल २७ कोटी २८ लक्ष निधी मंजूर केला असून त्याअश्या आहेत. अमळनेर तालुक्यातील गांधली, जळोद , वाघोदा, नंदगाव , लोणसीम, बहादरवाडी व डांगरी प्रगने (७), बोदवड तालुक्यात भानखेडा, मानमोडी व हिंगोणे (३), भुसावळ तालुक्यात ओझरखेडा, शिंदी, मोंढाळे, गोजरा व वराडसीम (५), चाळीसगाव तालुक्यात कुंझर, लोंढे, चैतन्यतांडा, इच्छापुर तांडा, बेलदारवाडी, ओझर व पिंपरी खुर्द ( ७), एरंडोल तालुक्यात आनंदनगर, हनुमंतखेडे बुद्रुक, ब्राह्मणे , सोनबर्डी, गालापूर, रवंजे खुर्द, निपाने, भातखेळा व टोळी( ९); जळगाव तालुक्यात दापोरा, तुरखेडा, सुभाषवाडी, तरसोद , धानवड व पिलखेडा ( ६ ), जामनेर तालुक्यात वडगाव बुद्रुक, कुंभारी बुद्रुक, ओझर, लोंढरी बुद्रुक , एकुलती, वाकी खुर्द, मोहाडी , पळासखेडा बुद्रुक, देवळसगाव, सामरोद व शेरी -(११), मुक्ताईनगर तालुक्यात धामणगाव, काकोडा, इच्छापुर,निमखेडी व चारठाणा ( ५), पाचोरा तालुक्यात सावखेडा खुर्द, होळ, डोकंलखेडा, आसनखेडा, परधाडे, वरसाडे प्र.बो. पिंप्री बु. प्र.भ., सारवे बु.प्र.भ., अंतुर्ली बुद्रुक, पिंप्री बु.प्र.पा. (डांभुर्णी), सारोळा खुर्द, मोंढाळे, सांगवी प्र.लो.- कुर्‍हाड (१३), भडगाव तालुक्यात बांबरुड प्र.ब. पथराड ,शिंदी व कोळगाव ( ४), पारोळा तालुक्यात तालुक्यात कन्हेरे ,शेवगे बुद्रुक, सावखेडे होळ, म्हसवे , मुंदाणे प्र. अ., टोळी , तरवाडे, करंजी, कंक राज ,कोळपिंप्री, ढोली, शिरसमनी, मंगरूळ व लोणी बुद्रुक ( १४), धरणगाव तालुक्यात रेल, कवठाळ, शेरी, पिंपळेसिम , बिलखेडा, चांदसर, अनोरे, भोणे, जांभोरे व कंडारी (१०), चोपडा तालुक्यात घुमावल, वडोदा, नरवाडे, मेलाणे, वैजापूर, सुटकार, उमर्टि , कमळगाव व देव्हारी ( ९) , रावेर तालुक्यात कोचुर बुद्रुक, निरूळ , वाघाडी , वाघोड , शिंदखेडा, मोरगाव बुद्रुक, धामोडी, उदळी बुद्रुक, मंगरूळ , ऊटखेडा, निमड्या, आंदलवाडी, रणगाव व रायपुर (१४) , आणि यावल तालुक्यात आडगाव , म्हैसवाडी, बामणोद , मोहराळा व अट्रावल व कोरपावली (६) या १२४ गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालये मिळणार आहेत.

दरम्यान, या संदर्भात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सुविधांचा अभाव असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे पाहून नवीन ग्रामपंचायती त्या देखील फर्निचरसह देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या ग्रामपंचायती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठराव्यात अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. तर, या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com