सासरच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय विवाहीतेची आत्महत्या

पती व जेठ अटकेत; दोन दिवसांची पोलीस कोठडी
सासरच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय विवाहीतेची  आत्महत्या

मलकापुर Malkapur

ग्राम वाघुड (Vaghuḍa) येथील ज्योती गजानन सनिसे वय २६ वर्ष हीने सासरच्या जाचाला (harassed by her father-in-law) कंटाळून राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या (suicide) केली.

पती गजानन दशरथ सनिसे, सासु इंद्रायणी दशरथ सनिसे, सासरे दशरथ सनिसे,जेठ राजु दशरथ सनिसे,जेठ दिपक दशरथ सनिसे,जेठाणी नंदा राजु सनिसे,सविता दिपक सनिसे सर्व (रा. वाघुड) तर नणंद ज्योति विलास वावगे( रा. वरणा ता. खामगांव ) यांच्या त्रासापाई दि. 09 जुलै रोजी रात्री ३ वा.च्या सुमारास ज्योती गजानन सनिसे हिने आत्महत्या केली.

हा प्रकार आत्महत्या नसुन घातपात असल्याचा संशय आल्याने मृतकाचा भाउ सागर वानखेडे यांनी मलकापुर शहर पो.स्टे ला घटनेची फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शहर पोलिसांनी भा.द.वि.चे कलम306,304 ब,498 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि नरेंद्रसिंह ठाकुर,पो.उप.नि.ठाकरे करीत आहे.

शवविच्छेदनानंतर वाघुड येथे पोलीस संरक्षणात अंतिम संस्कार करण्यात आले तर या घटनेतील आरोपी पती गजानन सनिसे,व जेठ राजु सनिसे यास अटक केली असुन यातील 5 जण फरार आहे. या दोघांना न्यायलयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com