
जळगाव - Jalgaon
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आज २३ फेब्रुवारी रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तेथील न्यायालयात पाच संशयिताविरोधात २ हजार ४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या आतापर्यंतच्या तपासात संशयिताची केलेल्या अपहाराची रक्कम ही ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ एवढी असल्याचे निष्पन्न झाले आहे.