
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
बिजनेस लोनच्या (business loans) नावाखाली शहरातील तरुणाची 24 लाखात फसवणुक (Fraud)करणार्या संशयित (Suspect)पुजा चौहान (रा. मिरारोड पुर्व भाईंदर जि. ठाणे) हीला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सायबर पोलिसांनी चार दिवसात अटक (arrested)केली. तिच्याकडून 16 लाख 60 हजारांची रोकड व तिच्या बँक खात्यातील दोन लाख असे एकूण 18 लाख 69 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.
बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुम्हाला 60 लाख रुपयांचे ऑनलाईन कार व बिजनेस लोन मंजूर करुन देतो. असे सांगत तरुणाकडून त्यापोटी ऑनलाईन जीएसटी टॅक्स, डॉक्युमेंट व आरटीआर आणि प्रोसेसिंग फि च्या नावाखाली तरुणाकडून पुजा सुनिल चौहान व महेश चव्हाण रा. नाशिक यांनी 24 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेतले होते. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दि.
14 फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषण करीत असतांना पथक मिरा भाईंदर येथे रवाना केले होते. या पथकाने शनिवारी मिरा भाईंदर येथून पुजा चौहान हीला ताब्यात घेण्यात आले होते. तिची कसून चौकशी केली असता, तिच्याकडून 16 लाख 60 हजार रुपयांची रोकड व बँक खात्यातील 2 लाख 9 हजार रुपये गोठविण्यात आले. असे एकूण 18 हजार 69 हजार रुपयेे हस्तगत करणयात आले.
चार दिवसात लावला गुन्ह्याचा छडा
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित अवघ्या चार दिवसात या गुन्ह्याची छडा लावला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली लिलाधर कानडे यांच्यासह पोउनि दिगंबर थोरात, राजेश चौधरी, ईश्वर पाटील, स्वाती पाटील, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांच्या पथकाने केली.