वरणगाव प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांसाठी २४ अर्ज

वरणगाव प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांसाठी २४ अर्ज

सर्वाधिक हरकती वार्ड ७ व ८ मधुन

वरणगाव (Varangaon) ता.भुसावळ - वार्ताहर

सर्वोच्च न्यायालयाच्या (Suprim court) निकालानुसार महाराष्ट्रात (Maharashtra) महानगरपालिका नगर परिषदा ग्रामपंचायत यांच्या निवडणूक कार्यक्रम (Election ProgramRजाहीर झालेला असून वरणगाव (Varangaon) नगरपरिषदेचा ( Nagar parishad) निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांवर शेवटच्या दिवसापर्यंत २४ अर्ज दाखल झालेले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत जिल्हा परिषद आदी निवडणूका प्रथम कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे लांबलेल्या होत्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले असल्याने निवडणुक आयोगाकडून निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला असुन वरणगाव नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. १० ते १४ मे हरकती मागविण्यात आल्या होत्या. १४ मे या शेवटच्या दिवसापर्यंत नगर परिषद कार्यालयात २४ हरकती व सूचना आलेले असून सर्वाधिक हरकती या वार्ड नंबर ७ व ८ मधील नागरीकांनी घेतलेल्या आहे. या हरकती व सूचनांवर दिनांक २३ मे पर्यंत सुनावणी होणार असून त्या नंतर ३० मे जिल्हाधिकारी आपला अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील व राज्य निवडणूक आयोग ६ जुन पर्यंत प्रभाग रचनेला मान्यता देतील.

Related Stories

No stories found.