जिल्हा बँकेसाठी सकाळी दहापर्यंत 23 टक्के मतदान

जिल्हा बँकेसाठी सकाळी दहापर्यंत 23 टक्के मतदान

जळगाव - jalgaon

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी 8 वाजेपासून सुरूवात झाली. बँकेच्या ९ मतदारसंघातील १० जागांसाठी आज सकाळी मतदान होत असून जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 23 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिली.

जिल्हा बँकेसाठी 21 जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 10 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात साली असून जिल्हातील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 23 टक्के मतदान झाले आहे. मतदानाची प्रक्रिया दुपारी 4 वाजेपर्यंत राहणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com