कॅरीबॅगला ब्लेड मारून 20 हजार रुपये लांबवले

यावल पोलिसात गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा शोध
कॅरीबॅगला ब्लेड मारून 20 हजार रुपये लांबवले

यावल - प्रतिनिधी yaval

यावल शहरातील सेंट्रल बँकेच्या (Central Bank) जवळ अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गालगत (Ankleshwar-Berhanpur State Road) सार्वजनिक ठिकाणी मुरलीधर मोहन पाटील (68, रा.चितोडा) हे चप्पल घेण्यासाठी थांबले होते व तत्पूर्वी त्यांनी बँकेतून 20 हजार रुपये काढले.

ते पैसे त्यांच्या कॅरीबॅगमध्ये होते, मात्र चप्पल घेत असताना भामट्याने 20 हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार मुरलीधर पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने यावल पोलिस (police) ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com