अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला 20 वर्षाची शिक्षा

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल; 12 जणांची साक्ष
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला 20 वर्षाची शिक्षा

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

चाळीसगाव (Chalisgaon) शहरात राहणार्‍या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse of a minor girl) करून गर्भवती करणार्‍या नराधमाला (massacre) जिल्हा न्यायालयाने (District Court) 20 वर्षे सश्रम कारावासाची (rigorous imprisonment) शिक्षा (Punishment) आणि 30 हजार रूपयांची दंड सुनावली आहे.

चाळीसगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र निकुंभ याला अटक केली होती.

या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या. बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. खटला सुरू असतांना पीडित मुलगी सज्ञान झाल्याने तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला आहे.

त्यामुळे तिची साक्ष नोंदविला आलेली नव्हती. या खटल्यात पीडीतेचे वडील, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीपुराव्याअंती रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ याला दोषी ठरवत विविध कलमान्वये 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 30 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. चारूलता बोरसे यांनी काम पाहिले. केसवॉच म्हणून दिलीप सत्रे यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com