अत्याचार करणार्‍या नराधमाला 20 वर्षे सश्रम कारावास

दोन वर्षानंतर पिडीत चिमुकलीला मिळाला न्याय
अत्याचार करणार्‍या नराधमाला 20 वर्षे सश्रम कारावास

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील एका भागात राहणार्‍या साडेचार वर्षाच्या बालिकेवर (four and a half year old girl) लैंगिक अत्याचार (sexual abuse) करणार्‍या आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावासाची (20 Years Rigorous Imprisonment) शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने (District Courts) गुरुवारी 21 जुलै रोजी दुपारी सुनावली आहे. दरम्यान दोन वर्षापासून सुरू असलेल्या या खटल्याचा आज निकाल लागल्याने चिमुकलीला न्याय मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी साडेचार वर्षाची चिमुकलीवर शेजारी आरोपी रवींद्र पुन्हा रंधे व 61 या वृद्धाने चिमुकलेला घरात बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना 15 मार्च 2020 रोजी घडली होती. या संदर्भात पीडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी म्हणून रवींद्र रंधे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा खटला जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी.वाय. काळे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला.

या खटल्यात एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या साक्षीच्या आधारे रवींद्र रंधे याला दोषी ठरवत त्याला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून गणेश नायकर यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com