
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून साडीने तीचे हातपाय बांधून अत्याचार (torturer) करणार्या दीपक सुभाष पवार (वय-20) या नराधाम आरोपीला विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी 20 वर्ष सश्रम कारावासाची (imprisonment) शिक्षा सुनावली.
जळगाव तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना दीपक पवार हा नराधाम पिडीतेच्या घरात घूसला. त्याने पिडीतेच्या तोंडाला रुमाल लावून साडीने तीचे हातपाय बांधून तीच्यावर अत्याचार केला होता. तसेच या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला जीवे ठार मारुन टाकेल अशी धमकी दिल्याची घटना जून 2021 मध्ये घडली होती.
अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे पीडीतेला गर्भधारणा देखील झाली होती. याप्रकरणी दीपक पवार याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालला. तपासधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार व विजय पाटील यांनी केला. तसेच त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या पूराव्यांनुसार प्रभावी युक्तीवाद करीत दीपक पवार याला दोषी ठरविण्यात आले. त्यानुसार आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावास व 45 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
13 साक्षीदारांची साक्ष महत्वपुर्ण
या खटल्यात सरकारपक्षाकडून एकूण 13 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पीडीतेची आई, वैद्यकीय अधिकार्यांसह तपासधिकार्यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. सरकारपक्षाकडून सरकारी अभियोकत्ता महेंद्र फुलपगारे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहाय्यक केले. तसेच मूळ फिर्यादीतर्फे अॅड. शारदा सोनवणे यांनी कामकाज पाहिले.