अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास २० वर्ष कारावास

सबळ पुराव्या अभावी साथीदार निर्दोष
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास २० वर्ष कारावास

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणार्‍या लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (वय-24, रा. गिरड ता. भडगाव) या नराधमाला विशेष पोस्को व अति. सत्र न्यायालयाने दोषी ठरवित त्याला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर त्याला मदत करणारा अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

भडगाव तालुक्यातील गिरड येथील लखन उर्फ विजय रमेश गायकवाड याने दि. 25 मे 2018 रोजी सकाळी 5 वाजच्या सुमारास अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. तसेच सुमारे तीन महिने तिच्यावर अत्याचार केला. त्याला पळवून नेण्यासासाठी संशयीत अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती.

या दोघांविरुद्ध पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोस्कोतंर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषरोप पत्र सादर केले होते.

पोस्कोतंर्गत कलमांवरुन धरले दोर्षी

हा खटला विशेष पोस्को न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालला. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यावरुन सरकारी वकीलांनी प्रभावी युक्तीवाद करीत लखन उर्फ विजय रमेश गायकवाड याला पोस्कोतंर्गत कलमांखाली दोषी ठरविले. तर त्याचा साथीदार अतुल गायकवाड याला पुराव्या अभावी त्याची निर्दोत मुक्तता करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com