एरंडोल बस स्थानका जवळ शिवशाही बस-मोटारसायकल अपघातात 2 जखमी

एरंडोल बस स्थानका जवळ शिवशाही बस-मोटारसायकल अपघातात 2 जखमी

एरंडोल Erandol (प्रतिनिधी) -

धुळ्याकडून येणारी (Shivshahi bus) शिवशाही बसने बसस्थानकात (bus station) वळण घेत असतांना समोरून येणारी दुचाकीला (motorcycle) धडक (accident) दिल्याने दोन जण जखमी झाले असल्याचे समजते. सदर घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास बस स्थानका जवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बस स्थानकाजवळ धुळ्याकडून येणाऱ्या शिवशाही बसणे दुचाकी स्वार साक्री तालुक्यातील दाम्पत्य जळगांव तालुक्यातील आसोदा येथे नातेवाईकांकडे नवसाच्या कार्यक्रमानिमित्त  जात होते.

धुळे बस आगाराची गाडी एरंडोल आगारात वळण घेत असतांना   मोटार सायकलस्वार राकेश हरी बच्छाव (वय 36), योगीता राकेश बच्छाव (वय 28), कार्तिक राकेश बच्छाव (वय 6) आणि भाग्यश्री राकेश बच्छाव (वय 9) बसला धडकल्याने झालेल्या अपघातात कार्तिक राकेश बच्छाव आणि भाग्यश्री राकेश बच्छाव यांना गंभीर दुखापत झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

अपघातात बसमधील प्रवासी आणि वाहक-चालक यांना कोणतीही  इजा झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर घटना नॅशनल हायवे नंबर सहा व स्थानकाजवळ असल्याने प्रवाशांनी व नागरिकांनी गर्दी केली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com