मुदत ठेवीची 2 कोटींची रक्कम परस्पर खात्यात वर्ग

बँक कर्मचार्‍याची करामत : जळगावच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुदत ठेवीची 2 कोटींची रक्कम परस्पर खात्यात वर्ग

भुसावळ । प्रतिनिधी । Bhusawal

येथील बँक ऑफ इंडिया (Bank of India) शाखेतील कर्मचार्‍याने बनावट दस्तऐवज बनवून 2 कोटी 12 लाख 934 रुपयांची रक्कम पत्नीच्या खात्यात वर्ग करुन बँक व ग्राहकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत येथील बाजारपेठ पोलिसात जळगावच्या (jalgaon) दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने बँक कर्मचार्‍यांसह ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निरंजन सोलंकी हे येथील बँक ऑफ इंडियाचे (Bank of India) कर्जदार आहेत. त्यांची बँकेत मुदत ठेव ही होती. दरम्यान, बँकेचे तत्कालीन अधिकारी योगेश प्रकाश भिलाणे याने सदरच्या ठेवीची 2 कोटी 12 लाख 934 रुपयांची रक्कम पत्नी तेजश्री योगेश भिलाने हीच्या बनावट बँक खात्यात (fake bank account) वर्ग केले होते. त्यानंतर सदरच्या रक्कमेचे विविध प्रकारचे ट्रांझिक्शन ही करण्यात आले आहे.

प्रकार उघडकीस

दरम्यान, बँकेचे कर्जदार असलेले निरंजन सोलंकी (Niranjan Solanki) यांनी बँकेचे कर्ज फेडल्यानंतर सदरची मुदत ठेव पावतीची रक्कम ही खात्यात वर्ग करण्यासाठी बँकेला सांगितले असता संबंधित कर्मचारी दीपक वाघ यांनी सदरची रक्कम 17 जुलै 2022 रोजी काढण्यात आल्याचे सांगितल्यानंतर मुदत ठेव पावतीचा अपहार झाल्याची बाब समोर आली.

पत्नीच्या खात्यात पैसे वर्ग

त्यानंतर बँक अधिकार्‍यांनी याबाबत नशिक येथून रक्कम वर्ग झालेली बँक व खाते तसेच त्यातील व्यवहाराची माहिती घेतली असता. सदरची 2 कोटी 12 लाख 934 रुपयांची रक्कम तेजश्री योगेश भिलारे (Tejashree Yogesh Bhilare) हिच्या खाते क्र. 06310110009190 मध्ये वर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र बँक सिस्टममध्ये सदरचे खाते उघडणे तसेच हस्ताक्षराचे नमुनेही उपलब्ध नाहीत. बँक खात्यात रक्कम वर्ग झाल्यानंतर भिलारे यांने बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरचे खाते अनिता छगन रायसिंग यांच्या नावे केले.

दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

निरंजन सोलंकी यांनी रक्कम परत मिळण्यासाठीच्या विनंती नंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरच्या कार्यालयीन चौकशी, तपासानंतर याबाबत बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक योगेश रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरुन बाजार पेठ पोलिसात योगेश प्रकाश भिलारे व तेजश्री योगेश भिलारे (Yogesh Prakash Bhilare and Tejashree Yogesh Bhilare) (दोघे रा.प्लॉट नं. 16, देवराम नगर, निमखेडी रोड, जळगाव) या दोघांविरुद्ध गु.रं.नं. 681/23, भा.दं.वि.419, 420, 421, 424, 463, 465, 467, 468, 470, 471, 471 अ, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील संशयित आरोपी योगेश प्रकाश भिलाणे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता दि. 20 पर्यत पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. अधिक तपास पो.नि. राहुल गायकवाड व सहकारी करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com