महामार्ग कंत्राटदाराला 18 कोटींच्या दंडाची नोटीस

महामार्ग कंत्राटदाराला 18 कोटींच्या दंडाची नोटीस
Representational Image

जळगाव । jalgaon

धरणगाव तालुक्यातील मौजे पाळधी बु. येथील गट नं. 229/2 मध्ये अवैध मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी महामार्गाचे कंत्राटदार जांडू कन्स्ट्रक्शन या कंपनीला 18 कोटी 9 लाख रूपयांच्या दंडाची नोटीस धरणगाव तहसीलदार यांच्यातर्फे बजावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मौजे पाळधी बु. येथील गट नं. 229/2 हे महेंद्र कृष्णा बागुल यांच्या मालकीचे आहे. करारनामानुसार जांडू कन्स्ट्रक्शनला मुरूम उत्खननाचे अधिकार देण्यात आले होते. या गटात 19 हजार 404 ब्रास मुरूम असल्याचे मोजमाप करण्यात आले असून त्यापैकी जांडू कन्स्ट्रक्शनला 5600 ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या गटातून 13804 ब्रासचे अवैध उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या गटाचा पंचनामा करण्यात आला असून हे उत्खनन जांडू कन्स्ट्रक्शन यांनीच केल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामा झाल्यानंतर 13804 ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी धरणगाव तहसीलदार यांनी जांडू कन्स्ट्रक्शन यांना बाजारभावानुसार पाच पट म्हणजेच 18 कोटी 9 लाख 98 हजार 48 रूपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तीन दिवसात याप्रकरणी खुलासा सादर करण्याचे आदेशही तहसीलदारांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.