रावेरात १७ वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

१२ वी पूर्व परीक्षेच्या तणावातुन भागलपूर एक्स्प्रेसपुढे झोकुन देत संपवली जीवनयात्रा
रावेरात १७ वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

रावेर|प्रतिनिधी raver

येथील शिवाजी चौकातील रहिवासी असलेल्या इयत्ता १२ मधील विद्यार्थ्यांना सकाळी भागलपूर डाऊन एक्सप्रेस खाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रावेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

येथील लोकेश संजय महाजन हा सरदार जी जी हायस्कूलमध्ये इयत्ता १२ मध्ये शिकत होता,१२ वी ची पूर्व परीक्षेची तयारी सुरू असून, त्याने दिलेला अभ्यास पूर्ण न केल्याने,भीतीने शनिवारी सकाळी भागलपूर डाऊन एक्सप्रेसखाली आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत भागलपूर एक्स्प्रेसच्या पायलटने ही घटना रावेर स्टेशन उपअधीक्षक गणेश कापडे यांना कळवली,त्यांनी आरपीएफला माहिती दिली असता, दुपारपर्यन्त ओळख पटत नव्हती, चार वाजेच्या सुमारास मयत रावेर शिवाजी चौकातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला.ग्रामीण रुग्णालयात मयताच्या शवविच्छेदन करण्यात आले, यावेळी मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी काँगेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भास्कर महाजन,ऍड एल के शिंदे,राजेश शिंदे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com