चाळीसगाव तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगणार

उंबरखेड, मेहूणबारे, दरेगाव या गावांकडे विशेष लक्ष
चाळीसगाव तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगणार

चाळीसगाव Chalisgaon । प्रतिनिधी

तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या उंबरखेड, मेहूणबारे, दरेगाव या प्रमुख गावांसह सांगवी, शिदवाडी, चिंचखेडे, डामरूण, हिंगोणेसीम, आडगाव, पिंपळवाड म्हाळसा, वलठाण, अंधारी, गणेशपूर, उपखेड, करजगाव, विसापूर या 16 ग्रामपंचायतींच्या (gram panchayat) निवडणूका (elections)होणार आहेत. या होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूकीत थेट जनतेतून (directly from the people) सरपंचाची (Election of Sarpanch) निवड होणार आहे. त्यामुळे उंबरखेड, मेहुणबारे व दरेगाव या गावांच्या निवडणुकांकडे विशेष लक्ष लागले आहे. यात मातब्बरांचा कस लागणार आहे.

चाळीसगाव तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगणार
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

तालुक्यायात 16 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी गावांमध्ये आजपासून राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. जनतेतून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने राजकीय पक्षांसह मातब्बर गाव पुढार्‍यांचा कस लागेल. ग्रामपंचायत निवडणूका ह्या पक्षीय पातळीवर लढल्या जात नसल्या तरी पक्षीय गट तट असल्याने प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होईल यात शंकाच नाही. विशेषत: तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या उंबरखेड व मेहूणबारे या गावांसह दरेगाव गावाकडे तालुक्याचे लक्ष आहे.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम-

या निवडणूकीसाठी तहसीलदार 18 नोव्हेंबर रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करतील. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. छाननी 5 डिसेंबर असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com