15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात ‘मापात पाप’

चार सदस्य तुपाशी, बाकीचे उपाशी; रावेर पंचायत समितीतील प्रकार
15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात ‘मापात पाप’
रावेर पं. स.च्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना निवेदन पं.स. सदस्या प्रतिभा बोरोले.

रावेर Raver । प्रतिनिधी-

रावेर पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) 15 व्या वित्त आयोगाचा (Finance Commission) 1 कोटी 37 लाख विकास निधीच्या असमान वाटपाने मकर संक्रात सणासुदीला पंचायत समितीत वादाचा खटका पडला आहे.थेट गटविकास अधिकारी यांना जबाबदार समजून संतप्त सदस्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी गटातील भाजपच्या (BJP) काही सदस्यांना डावलून हा निधी (Funding) वाटप झाल्याने, भाजपचे दोन सदस्यांनी काँग्रेस (Congress)राष्ट्रवादी (Nationalist) व सेनेला (SHIV SENA) साथ देत स्वपक्षीय सहकारी सदस्यांविरुद्ध या भूमिकेबद्दल रोष प्रकट केला आहे.

रावेर पंचायत समितीत भाजपचे बहुमत आहे.12 सदस्यांपैकी भाजप-8,सेना-1,काँग्रेस-1 व नाथाभाऊ समर्थक योगिता वानखेडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे-3 सदस्य आहे. त्यामुळे सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, माजी सभापती जितु पाटील,गटनेता पी के महाजन यांनी 1 कोटी 37 लाख निधी घेऊन इतर सदस्य जुम्मा तडवी, राष्ट्रवादीचे दीपक पाटील,सेनेचे रुपाली कोळी,अनिता चौधरी या चौघांना प्रत्येकी 7 लाखाचा निधी दिला आहे.

तर राष्ट्रवादीचे योगेश पाटील,काँग्रेसच्या प्रतिभा बोरोले,माजी सभापती माधुरी नेमाडे, योगिता वानखेडे या चौघांना डावलेले असल्याने,त्यांनी शुक्रवारी थेट गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात असमान निधी वाटपाबाबत गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

यावेळी गटविकास अधिकारी कोतवाल यांनी सोमवारी सबंधित सदस्यांची बैठक घेऊन यात सामोपचार घडवून आणणार असल्याचे आश्वासन संतप्त सदस्य योगेश पाटील, प्रतिभा बोरोले व माजी सभापती माधुरी नेमाडे यांचे पती गोपाळ नेमाडे, अनिता चौधरी यांचे पती महेश चौधरी यांना दिले आहे.

निधी वाटपाबाबत गटविकास अधिकारी यांना संपूर्ण माहिती होती,त्यांनी हि बाब आमच्या निदर्शनास आणून दिली नाही.ते संबधिताना पाठीशी घालत आहेत. सर्व कामाना थांबवण्यात यावेत. ज्या कामांच्या शिफारशी मिळाल्या आहे त्या सर्व 19 कामे रोखावेत अशी भूमिका मांडली आहे. याबाबत आता शांत बसणार नाही, आमच्या अधिकाराचा निधी मिळवू, गुरुवारी याबाबत सभापती यांचे पती हरलाल कोळी पंचायत समितीत सभापती यांच्या कक्षात बाजू मांडत होते, त्यांना सभापती यांनी माहिती द्यावी तुम्ही सभापती नाहीत, अशा शब्दात समाचार घेतला आहे.

प्रतिभा बोरोले, पं.स.सदस्या

निधी बाबत आम्ही कामे सुचवली होती.त्या सर्व कामांना डावलून मोजक्या सदस्यांनी हा विधी वाटून घेतला आहे.याबाबत थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कालच तक्रार केली आहे.असमान निधी केवळ राष्ट्रवादीच्या सदस्यांना नाही तर सत्ताधारी गटातील सदस्यांना पण दिला आहे.चार जणांना तर एकही रुपया मिळाला नसल्याने,आपल्या भागातील जनतेला आम्ही कामे नाही केली तर काय उत्तर देणार,यासाठी हा सर्व आराखडा रद्द करण्यात यावा,नव्याने कामांची मंजुरी घ्यावी अशी आमची मागणी आहे.

योगेश पाटील पं.स. सदस्य

सबंधित सदस्यांनी सुचवलेल्या कामांना मंजुरी मिळावी या ठरावाला पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सर्वांनी मंजुरी दिली होती. त्यात चार सदस्यांनी सुचवलेली कामे नसल्याचे दिसून आले आहे.याबाबत आता तक्रारी झाल्याने, सोमवारी बैठक घेऊन विषयाला मार्गी लावणार आहे.2021-22 च्या कामांसाठी अद्याप निधी नसल्याने कामे अजून होणार नाही.सदरील कामे मंजुरीचे पूर्ण अधिकारी सभापती यांना असल्याने, त्यांनी सुचलेल्या कामांना मंजुरी मिळाली आहे.याबाबत मला काही माहिती नव्हती. काही सदस्यांना यात डावलले असल्याची तक्रार आली आहे, त्याबाबत सोमवारच्या बैठकीत हा प्रश्न सभापती यांच्या पुढे मांडून त्यावेळी होणार्‍या निर्णयाने मार्ग काढण्यात येईल.

- दिपाली कोतवाल, गटविकास अधिकारी, पं. स.रावेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com