यावल बाजार समितीत भाजपा-सेनेच्या सहकार पॅनलला 15 जागा

काँग्रेस आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला तीन जागांवर समाधान, दिग्गजांचा पराभव
यावल बाजार समितीत भाजपा-सेनेच्या सहकार पॅनलला 15 जागा

यावल - प्रतिनिधी

यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीच्या (election) मतमोजणी नंतर भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सहकार पॅनलने 15 जागा पटकावत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट शेतकरी विकास पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले त्यात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक विनोद कुमार पंडित पाटील यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास दगडू चोपडे अनिल साठी यांना पराभवाचा फटका बसला.

यावल बाजार समितीत भाजपा-सेनेच्या सहकार पॅनलला 15 जागा
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघ मधील विजयी उमेदवार पाटील हर्षल गोविंदा 311 चौधरी दीपक नरोत्तम ३१० पाटील उमेश प्रभाकर ३०८ हेगडे राकेश वसंत 299 महाजन सागर राजेंद्र 294 चौधरी पंकज दिनकर 289 पाटील संजय चुडामन 282

यावल बाजार समितीत भाजपा-सेनेच्या सहकार पॅनलला 15 जागा
पाचोरा कृउबास निवडणूक ; महाविकास आघाडीच्या पॅनलची वाटचाल बहुमताकडे

सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघात माजी सभापती तथा कृषीभूषण चौधरी नारायण शशिकांत यांना 394 मिळून विजयी झाले सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघात फलक कांचन ताराचंद यांना 351 तर राखी योगराज बराटे यांना 332 मते मिळून विजयी झाल्या सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या गटातून राजपूत उज्जैन सिंग भावलाल हे 324 मते पडून विजयी झाले. त्यांनी अनिल प्रल्हाद पाटील यांचा पराभव केला.

यावल बाजार समितीत भाजपा-सेनेच्या सहकार पॅनलला 15 जागा
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप-शिवसेनेचा सुपडा साफ

ग्रामपंचायत मतदार संघात सुद्धा भाजप सेना युतीने त्यांच्या पॅनलचे उमेदवार विजयाची घोडदौड कायम ठेवली अनुसूचित जाती जमाती मतदार संघात दगडू जनार्दन कोळी उर्फ बबलू यांनी 325 मते मिळवून विजय संपादन केला त्यांनी सुलेमान कान्हा तडवी यांच्या पराभव केला ग्रामपंचायत आर्थिक दुर्व घटक मतदार संघात तळलेले यशवंत माधव त्यांनी 321 मतं मिळवून विजय संपादन केला त्यांनी अंगारे पौर्णिमा राकेश यांच्या पराभव केला ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात विलास चंद्रभान पाटील यांना 297 मते तर सूर्यभान निंबा पाटील यांना 296 मते सर्वाधिक मतं पडल्याने ते विजयी झाले त्यांनी शेखर सोपान पाटील व सुनील नामदेव पाटील भाऊसाहेब यांच्या पराभव केला.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा व्यापारी अडते मतदार संघ आणि हमाल मापारी मतदारसंघ यांच्यावर प्रभुत्व राहिले व्यापारी मतदार संघात अशोक त्र्यंबक चौधरी यांना 188 मतं तर सय्यद युनूस सय्यद युसुफ यांना 167 मते मिळवून विजयी झाले त्यांनी सहकार गटाचे म्हणजेच भाजपाच्या गटाचे चौधरी जितेंद्र पद्माकर व गडे निलेश सुरेशचंद्र यांचा पराभव केला तर हमाल मापारी मतदार संघातील सुनील वासुदेव बारी शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना 460 मते पडल्याने ते विजयी झाले तर प्रतिस्पर्धी सचिन बारी यांना 392 वर थांबावे लागले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com