तेरापंथ युवा परिषदेतर्फे आयोजित महारक्तदान शिबिरातून 1402 पिशव्या रक्त संकलन

तेरापंथ युवा परिषदेतर्फे आयोजित महारक्तदान शिबिरातून 1402 पिशव्या रक्त संकलन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तेरापंथ युवा परिषदेतर्फे (Terapanth Yuva Parishad) जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरामध्ये 7 ठिकाणी रक्तदान शिबिर झाले. तरुणांसह नागरिकांनी (. Citizens including the youth) मोठ्या उत्साहाने सहभाग (Participation) घेतल्याने जिल्हाभरातून (across the district) 1402 रक्त संकलन (blood collection) यशस्वीपणे करण्यात आले.

तेरापंथ युवक परिषदेतर्फे देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यामधून अधिकाअधिक रक्त संकलन होऊन नागरिकांना वेळेवर रक्तपुरवठा मिळावा असा उद्देश संस्थेचा होता. यापूर्वी देखील दहा वर्षांपूर्वी त्यांनी असे भव्य महारक्तदान शिबिर घेऊन महत्त्वाचे योगदान दिले होते. जल्ह्यामध्ये एकूण 1402 रक्त संकलन करण्यात तेरापंथ युवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना यश आले.

या ठिकाणी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. काही शिबिरांच्या ठिकाणी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, डॉ. अनुराधा राऊत यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दिली.

रक्तदान शिबिरासाठी अध्यक्ष सुदर्शन बैद, चेअरमन सुमित छाजेड, हिम्मत सेठिया, पारस लुनिया, पारस कुचेरिया, अरुण बुचा, रवींद्र छाजेड, प्रदीप कोठारी, हेमंत छाजेड, चिराग सेठिया, पारस सेठिया, रुपेश सुराणा, मोहित सेठिया, पवन समसुखा, दिनेश सेठिया आदींनी परिश्रम घेतले.

सात ठिकाणाहून 574 रक्ताचे संकलन

शहरात अणुव्रत भवन येथे 68, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट येथे 54, मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे 40, मु. जे. महाविद्यालयातील कला विभाग येथे 77, बांभोरी येथील एसएसबीटी संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 139, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दीक्षांत समारंभ 155 तसेच एमआयडीसी येथील श्री नॅशनल केम कंपनी या ठिकाणी 41 असे एकूण 574 रक्तसंकलन झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com