मुक्ताईनगर येथे ट्रॅक्टरच्या धडकेत चौदा वर्षीय बालक ठार

मुक्ताईनगर येथे ट्रॅक्टरच्या धडकेत चौदा वर्षीय बालक ठार

मुक्ताईनगर Muktainagar

शहरातील खामखेडा रस्त्यावरील स्मशान भूमी च्या पुढे ट्रॅक्टर (tractor) ने दिलेल्या धडकेत (collision) चापोरा येथील शोएब खान रफीक खान (Shoaib Khan Rafiq Khan) वय 13 याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना दोन जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

फिर्यादी शेख अकील शेख रुस्तम व 32 रा. मुक्ताईनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे भाचे मोहसीन खान महबूब खान वय 18 तसेच शोएब खान रफीक खान वय 13 दोघे राहणार चापोरा तालुका जिल्हा ब्रानपुर मध्यप्रदेश हे अकरा वाजेच्या सुमारास हिरो कंपनीची आय स्मार्ट कंपनीच्या काळया रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सी बी 0928 ने त्यांचे कडे लग्न असल्याने कपडे शिवण्यासाठी मुक्ताईनगर येथे आलेले होते.

दिनांक 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन्ही भाचे मोटरसायकलने चापोरा कडे जात असताना स्मशानभूमीचे पुढे रोडवर पाठीमागून ट्रॅक्टरने धडक मारल्याने शोयेब हा जागीच ठार झाला. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर चे पुढील डाव्या बाजूकडील चाकाखाली दबला होता व भाचा मोहसीन खान मेहबूब खान हा देखील जखमी अवस्थेत रोडवर पडला होता.

ट्रॅक्टर चालकानी याआधी पुर्णाड फाटा कडून मुक्ताईनगर कडे येणाऱ्या मोटरसायकलला देखील ठोस मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून चालक संदीप महादेव तायडे वय 33 धंदा ड्रायव्हर राहणार जुने गाव मुक्ताईनगर यास घटनास्थळी उपस्थित आणि पकडून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आणून जमा केले.

सदर ट्रॅक्टर मध्ये वाळू होती व ती पूर्णा नदी चे महादेव मंदिराच्या आवारात टोळीतील वाळू कुठेतरी खाली करून ट्रॅक्टर रिकाम्या स्थितीत मिळून झाल्याचे तक्रारीत म्हटले आह. दरम्यान होंडा कंपनीची एस पी शाईन विना नंबरची लाल रंगाची मोटरसायकल वरील दोघांचा देखील याचा ड्रायव्हरने अपघात केला असून ते जखमी अवस्थेत असून त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात आणण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.शेख अखिल यांच्या फिर्यादीवरून संदीप महादेव तायडे याच्यावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो हे का श्रावण जावरे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com