
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
आई ड्युटीवर गेली असतांना घरात एकटी असलेल्या 17 वर्षीय दिशा विठ्ठल नाईक रा. शिवकॉलनी या तरुणीने (girl) बेडरुममध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे (suicide) नेमके कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील शिवकॉलनी परिसरातील श्री अपार्टमेंट येथे दिशा नाईक ही तिच्या आईसह वास्तव्यास होती. दिशा हिची आई जिल्हा परिषदेत अनुकंपावर नोकरीला असून, नेहमीप्रमाणे त्या सकाळी 9 वाजता ड्युटीवर निघून गेल्या होत्या. त्यामुळे दिशा ही घरी एकटीच होती. शुक्रवारी दिशा ही घरी एकटी असतांना तिने ओढणीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी सात वाजता आई घरी आल्यावर तिला घरात दिशा हि गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, अजित पाटील, जितेंंद्र तावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवुन तो जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक जाधव यांनी दिशा नाईक हिला मृत घोषित केले.
बारावीच्या वर्गात घेत होती शिक्षण
दिशा ही शहरातील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेत होती. दिशाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मोठा भाऊ हा पुणे येथे शिक्षण घेत आहे. दिशाने आत्महत्या का केली ? त्याचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी उषा सोनवणे या करीत आहेत.