रावेर तालुक्यात वादळाने १२५२ हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त

रावेर तालुक्यात वादळाने १२५२ हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त

रावेर | प्रतिनिधी raver

गुरुवारी रात्री आलेल्या वादळाने २२ गावातील शेतीशिवारात केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. १६५२ शेतकऱ्यांच्या १२५२ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

रावेर तालुक्यात वादळाने १२५२ हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त
रावेर तालुक्यात चक्रीवादळाचे थैमान

तर १० गावात २२७ घरांची पडझड व दोन गुरे देखील वादळाच्या तडाख्यात दगावली असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाचा आहे.नुकसान झालेल्या भागात खा.रक्षा खडसे यांनी पाहणी केली. तसेच तहसीलदार बंडू कापसे, कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी संयुक्त पाहणी केली. आ.शिरीष चौधरी यांच्यावर मुंबईत हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांनी रुग्णालयातून प्रशासनाला पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाबंधी सूचना दिल्या आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com