दूध विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

जिल्हा दूध संघाची वार्षिक सभा
दूध विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघाच्या (District Milk Union) सभासदांनी (members) प्रतिलीटर 1 ते दीड रूपया फरक (Get the difference) मिळावा अशी मागणी (demand) होती. मात्र जिल्हा दूध संघाने 30 पैसे फरक देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा दूध संघाच्या काही सभासदांनी सभात्याग (Members walked out) केला. दरम्यान जिल्हा दूध संघाने गेल्या सहा वर्षात दूध विक्रीमध्ये (Increase in milk sales) 12 टक्क्यांची वाढ केली असल्याचे आ.खडसे (MLA. Khadse) यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे, अ‍ॅड. वसंतराव मोरे, डॉ.संजीव पाटील, जगदीश बढे, शामल झांबरे, पुनम पाटील, सुनिता पाटील, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. या सभेत मंजुरीसाठी 11 विषय ठेवण्यात आले होते. सर्व विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.

दूध संघाच्या खरेदी-विक्रीत वाढ

जिल्हा दूध संघाने गेल्या सहा वर्षात आपल्या दूध विक्रित वाढ केली असून, 2021 च्या तुलनेत या वर्षी जिल्हा दूध संघाकडून होत असलेल्या विक्रीत एकूण 12 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. खासगी व्यापारी व गुजरात राज्यातील दूध संघानी जिल्ह्यात दूध खरेदी सुरु केल्यामुळे जिल्हा दूध संघाला मोठी स्पर्धा करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुधाच्या चोरीची सभासदांची तक्रार

दूध संघातील वाहने दूधाची विक्री करत असताना मोठ्या प्रमाणात दूधाची चोरी होत असल्याचा तक्रारी सभासदांनी केल्या. त्यामुळे या वाहनांवर जिपीएस प्रणाली लावण्याची मागणी केली. मात्र सद्यस्थितीत अशी यंत्रणा लावणे संघाला परवडणारे नसल्याचे आ. खडसे यांनी सांगितले. दरम्यान चोरीचे प्रकार होत असतील तर याबाबत चौकशीचे आदेश कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिले आहेत.

भाजपासह शिंदे गटाचे संचालक गैरहजर

दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या संचालकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, भाजपाचे आमदार राजुमामा भोळे, भैरवी पलांडे हे सभेला गैरहजर राहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com