मध्य रेल्वेचे भुसावळ विभागातील 118 कर्मचारी सेवानिवृत्त

37 कोटी 93 लाख 18 हजार 293 रुपये खात्यात वर्ग
मध्य रेल्वेचे भुसावळ विभागातील 118 कर्मचारी सेवानिवृत्त

भुसावळ (Bhusawal) (प्रतिनिधी) -

रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातुन ( Bhusawal Division Railway) दि. 31 मे 2022 रोजी 118 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त (Retired) झाले. सेवानिवृत कर्मचार्याना रेल्वे तर्फे तत्काल 37 कोटि 93 लाख 18 हजार 293 रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेन्द्र वडनेरे यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती (Virtual online retirement) कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन बुरहानपुर , भुसावळ, मुर्तिजापुर , अकोला, बडनेरा , मनमाड, नाशिक इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत.

सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुकमैया मीना , नविन पाटील , वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बि एस रामटेके यांनी केले. यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com