राज्यसेवा पूर्व परीक्षेला 1143 उमेदवारांची दांडी

राज्यसेवा पूर्व परीक्षेला 1143 उमेदवारांची दांडी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शासनातर्फे आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षेला (State Services Pre-Examination) 1143 उमेदवारांनी (candidate) दांडी (Absent) मारली. तर 2895 उमेदवार यांनी परीक्षा दिली.

राज्य शासनातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 13 उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 4 हजार 32 उमेदवार पात्र होते. मात्र, सकाळच्या सत्रात 1115 उमेदवारांनी दांडी मारली असून, 2895 उमेदवारांनी परीक्षा दिली तर दुपारच्या सत्रात 1143 उमेदवार गैरहजर राहिले आणि 2867 उमेदवारांनी परीक्षा दिली.

या परीक्षेसाठी प्रत्येक वर्गातील कामकाजाचे सीसीटीव्हीव्दारे चित्रीकरण करण्यात आले आहे. परीक्षेनंतर आता, चित्रीकरण तपासले जाणार असून, आयोगाच्या सूचनांचे पालन न करणार्‍या उमेदवार आणि कर्मचारी यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com