ग.स.सोसायटीच्या मयत सभासदांच्या कुटुंबियांना 100 टक्के कर्जमाफी!

अध्यक्ष उदय पाटील यांची माहिती, ग.स.सोसायटीची आज वार्षिक सभा
ग.स.सोसायटी jalgaon
ग.स.सोसायटी jalgaon

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सभासदांना निवडणूकपूर्वी दिलेल्या वचनानुसार संचालक मंडळाने 4 महिन्यात जामीन कर्ज व्याज (Guaranteed loan interest rate) दरात 1 टक्का कपात व वर्गणीच्या आतील कर्ज व्याज दरात 0.50 टक्के कपात (Subscription loan interest rates) करुन सभासदांना आर्थिक दिलासा दिलेला आहे. तसेच मयत सभासदांच्या (deceased members) कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण 100 टक्के कर्ज माफी (100 percent loan waiver) तसेच कर्ज नसलेल्या मयत सभासदांच्या कुटुंबास 1.50 लाख आर्थिक सहाय्य देण्यात येईल. सहकार गटाने (cooperative group) निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती (Fulfillment of promises) करण्यात येत आहेे, अशी माहिती ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील (G.S.Society President Uday Patil) यांनी शनिवारी ग.स.सोसायटीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील
ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील

यावेळी ग.स.सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संचालक अजबसिंग पाटील, क.नि.समितीचे अध्यक्ष अजय देशमुख, कर्ज समिती अध्यक्ष योगेश इंगळे, ग.स.प्रबोधनी अध्यक्ष मंगेश भोईटे, लोकसहकार गटाचे गटनेता सुनिल सुर्यवंशी, प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, संचालक भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल गायकवाड, विश्वास पाटील, महेश पाटील, प्रतिभा सुर्वे, रागिणी चव्हाण, अजयराव सोमवंशी, मनोज माळी, विजय पवार, निलेश पाटील, योगेश सनेर, अमरसिंग पवार,तज्ज्ञ संचालक राम पवार, जयश्री महाजन, व्यवस्थापक वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

उदय पाटील पुढे म्हणाले की, जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे दि. 31 मार्च 2022 अखेर सभासद संख्या 34 हजार581 असून खेळते भांडवल 1060.49 रु.कोटी आहे. सभासद वर्गणी 727.02 कोटी रु.आहे. सभासद ठेवी 139.46 कोटी रु.राखीव निधी 35.74 कोटी रु. संस्थेची गुंतवणूक 103 .36 कोटी रु. तर नफा 7 कोटी 74 लाख 69 हजार 234रु.झाला आहे. मागील आर्थिक वर्षात (2021-22) प्राधिकृत अधिकारी मंडळाने मंजुर केल्यानुसार सभासदांना यावर्षी 6 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. तसेच 800 रु.मिटींग भत्ता वाटप केला जाणार आहे सकाळी 7 ते 10वाजेपर्यंत भत्ता वाटप करण्यात येईल.

ग. स. मयत सभासदांना संपुर्ण 100 टक्के कर्ज माफी ही वचनांची पुर्तता केली असल्याचे सांगत अध्यक्ष उदय पाटील म्हणाले की, सभासद जामिन व विशेष कर्ज पगाराच्या मर्यादानुसार 15 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मयत, लवादी थकबाकीदार सभासदांसाठी सामोपचार सशर्थ कर्ज परतफेड योजना लागू करणार आहे. वय वर्ष 80 पर्यंतच्या सभासदांसाठी 170रु. प्रती वर्ष प्रिमियममध्ये 5 लाख रुपयांचा गृप जनता अपघात विमा लागू करण्यात येणार आहे.

40 टक्के शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक कर्मचार्‍यांना सभासद करण्यात येईल. सभासदांसाठी दरमहा 7 टक्के मासिक व्याज देणारी अभिनव ठेव योजना, डि.सी.पी.एस.धारकांकरीता नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात येईल. 10 लाख रुपयांपर्यंत सभासद गृप नैसर्गिक मृत्यू विमा योजना लागू करणार आहे. ग.स. मोबाईल अ‍ॅपव्दारे सभासदांना त्यांचे खात्याची माहिती सुविधा उपलब्ध करण्यात येईल,असेही अध्यक्ष उदय पाटील यांनी सांगितले.

ग.स.सोसायटीची आज वार्षिक सभा

ग.स.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.4 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com