तिकिट तपासणीत 100 कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाची एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान कारवाई
तिकिट तपासणीत 100 कोटींचा दंड वसूल

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

मध्य रेल्वेने (Central Railway) तिकिट तपासणी (ticket inspection) कारवाईत 100.82 कोटी रुपयांचा दंड वसुल (Fine recovered) केल्याची कारवाई 1 एप्रिल ते 6 नोव्हेबर 2021 दरम्यान केली. यात अनियमित प्रवास (Irregular travel) करणार्‍या 29 हजार 19 प्रवाशांडून 17.22 लाखांचा दंड वसुल करण्यात आला असून त्याच्यावर (Action as per Covid-19) करत दंड वसुल करण्यात आला. .

मध्य रेल्वेने शासनाच्या कोविड-19 नियमांचे पालन करत प्रवाशांना प्रवासादरम्यान सुरक्षित व जागरूक केले आहे. नियमांंचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत भुसावळ विभागाने 4.68 लाख प्रकरणात 33.74 कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे. मुंबई विभागाने 6.83 लाख प्रकरणात (33.20 कोटीरुपये), नागपुर विभाग 2.51 लाख प्रकरणात (16.73 कोटी रुपये) आणि सोलापुर, पुणे विभागात 3.20 लाख प्रकरणात (17.15 कोटी) रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

1 एप्रिल ते 6 नोव्हेंबर दरम्यान, तिकिट तपासणी कर्मचार्‍यांच्या विशेष पथकांनी कोविड-19च्या नियमांचे पालन न करणार्‍या 29 हजार 19 प्रकरणात हा दंड वसुल करण्यात आला. तोंडावर मास्क, फेस कव्हर न घातलेल्या 23 हजार 816 प्रकरणे, कोविड-19निर्देशांचे पालन न करणार्‍या 5 हजार 203 प्रकरणे अशा एकुण अनुक्रमे 39.68 लाख रुपये आणि 26.02 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचे प्रवाशांना चांगील्या सुविधा देण्यासाठी व विना तिकिट प्रवास करणार्‍यांवर आळा घालण्यासाठी नियमित प्रयत्न होत आहे. मेल एक्सप्रेस व स्पेशल गाड्यांमध्ये तिकिट तपासणी मोमिह गांभिर्याने राबविण्यात येत आहे. प्रवाशांनी योग्य तिकिट काढून तसेच कोविड -19 च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनेकरण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com