सहकार भारतीच्या अधिवेशनाला जिल्ह्यातून १०० कार्यकर्ते जाणार : डी. आर. पाटील

सहकार भारतीच्या अधिवेशनाला जिल्ह्यातून १०० कार्यकर्ते जाणार : डी. आर. पाटील

धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी)

)सहकार भारतीचे (Sahakar Bharati) 7 वे राष्ट्रीय अधिवेशन (National Convention) 17/ ते 19 डिसेंबर 2021रोजी उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ (Lucknow) येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातून १०० कार्यकर्ते (Activists) जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख दिलिप रामू पाटील (Head of National Co-ordination) (Dilip Ramu Patil) यांनी दिली.

या अधिवेशनाला संपुर्ण देशभरातुन प्रतेक जिल्ह्याचे पदाधिकारी अपेक्षित आहेत. सुमारे पांच हजार हुन अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सदर अधिवेशनाचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांचा हस्ते होईल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, व रा स्व संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी, यांचे संघटनात्मक वाढीचा दृष्टीने मार्गदर्शन होणार आहे.

सहकार भारतीचे प्रेणेते स्व लक्ष्मणदार इनामदार स्मृती पुरस्कार वितरण समारंभात सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे व्यक्तिस दिला जाणार आहे. अधिवेशनाचा निमित्ताने भव्य प्रदर्शनीचे आयोजन, सहकार यशोस्वी गाथा,व विविध महत्वपुर्ण चर्चा प्रस्ताव आदि होऊन सहकारात नवी दिशा दिली जाईल.

सहकार भारतीचे राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख दिलीप रामु पाटील, महिला प्रमुख सौ रेवती शेदुर्णीकर बॅक प्रकोष्ठ संजय बिर्ला, जळगाव जिल्हा अध्यक्ष विवेक पाटील संघटन प्रमुख अॅड विकास देवकर, नरेंद्र नारखेडे, जिवन राऊळ, प्रविण पाटील सह १०० कार्यर्ते या अधिवेशनात जाणार आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com