चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍यास दहा वर्ष कारावास

जिल्हा न्यायालयाचा निकाल; पिडीतेची साक्ष ठरली महत्वपुर्ण
prison संग्रहित छायाचित्र
prison संग्रहित छायाचित्र

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तंबाखूची पुडी (Tobacco powder) देण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न (Attempt to rape a five-year-old girl) करणार्‍या भगवान शंकर करपे (वय-50, रा. मोईखेडा दिगर ता. जामनेर) यांना जिल्हा न्यायालयाने (District Court) 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा (10 years rigorous imprisonment) सुनावली. या खटल्यात पिडीतेसह तिच्या आजीची साक्ष महत्वपुर्ण ठरली.

जामनेर तालुक्यातील एका खेडे गावात पाच वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिमुकली खेळत असतांना भगवान शंकर करपे यांनी त्या चिमुकलीला तंबाखूची पुडी घेण्यासाठी दुकानावर पाठविले. मुलीने तंबाखूची पुडी देण्यासाठी गेली असता आरोपी भगवान करपे याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुनह्यातील भगवान शंकर करपे याला अटक करण्यात आली होती. जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश डी.वाय.काळे यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला.

सात जणांची साक्ष ठरली महत्वाची

या खटल्यात एकुण सात साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीतेसह तिच्या आजीची साक्ष महत्वाची ठरली. मंगळवारी खटल्याचे कामकाज झाल्यानंतर न्यायालयाने भगवान करपे याला दोषी ठरविले.

दहा वर्षाच्या शिक्षेसह 5 हजारांचा दंड

विविध कलमान्वये 10 वर्षाचा सश्रम कारावास आणि 5 हजाराची दंड आणि दंड न भरल्यास 3 महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारूलता बोरसे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी म्हणून गणेश नायकर यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com