दहा लाखांच्या रोकडसह १५ लाखांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल
दहा लाखांच्या रोकडसह १५ लाखांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील बोढरे (Bodhare) (लहान) गांवातून अज्ञाच चोरट्यान बंद घरात (Entering the house) घुसून १० लाखांच्या रोकडसह सोन्याचे (Gold jewelery with cash) दागिने असा एकूण १५ लाख १९ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves)चोरुन नेला आहे. हि घटना दि,१७ रोजी घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

दहा लाखांच्या रोकडसह १५ लाखांचा मुद्देमाल लंपास
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

तालुक्यातील बोढरे (लहान) येथे राहणारे संदीप चैनसिंग राठोड (वय २१ ) धंदा शेती, यांच्या वडील चैनसिंग राठोड यांना किडनीचा आजार असल्याने त्यांना सुमारे १० दिवसापासून नारायणी हॉस्पीटल, नाशिक येथे औषधोपचारासाठी दाखल केले. आहे.

तेथे ते आईसह थांबले होते. दिनांक १६/११/२०२२ रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास ते नाशिक येथून बोढरे येथे परत आले. व रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास ते त्यांच्या जुन्या घरुन जेवण करून नवीन घरी आले. तेव्हा त्यांचा मोठा भाऊ सुरेश राठोड त्यांच्या नव्या घरी झोपलेला होता. काही वेळाने ते गांवातील जुन्या घरी झोपायला निघुन गेले. काही वेळाने संदीप राठोड हे काका जयसिंग मेघा राठोड व चुलत भाऊ योगेश अनिल राठोड असे त्यांच्या घराबाहेर ओट्यावर झोपलो होते.

दहा लाखांच्या रोकडसह १५ लाखांचा मुद्देमाल लंपास
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

संदिप याची तब्बेत बरी नसल्याने व थंडी वाजत असल्याने, ते रात्री ११ वाजेच्या सुमारास घरात झोपण्यासाठी गेले. त्यावेळी घराचा मुख्य दरवाचा उघडाच ठेऊन फक्त लोटलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दिनांक १७/११/२०२२ रोजी पहाटे ०४.३० वाजेच्या सुमारास संदिप राठोड हे रनिंग ला जाण्यासाठी उठले असता, घराचा जिन्या कडील दरवाजा उघडा दिसल्याने व मागील रुम मधिल पत्री कोटीतील सामान कोठीबाहेर घरात अस्ताव्यस्त फेकलेला व पत्री कोठीचा कोंडा तुटलेला दिसल्याने त्यांनी लागलीच घराबाहेर झोपलेले काका जयसिंग मेघा राठोड यांना उठविले व गावात राहाणारा मोठा भाऊ सुरेश चैनसिंग राठोड यास मोबाईल फोन द्वारे सदरची घटना कळविली, त्यामुळे ते देखील लागलीच घटनास्थळी आले.

तेव्हा संदिप तसेच भाऊ सुरेश चैनसिंग राठोड, काका जयसिंग मेघा राठोड, चुलत भाऊ योगेश अनिल राठोड अशांनी मागील रुम मधिल पत्री कोठीत ठेवलेले कापडी पिशवी व स्टीलचे डब्यातील पैसे तसेच लहान पत्री पेटीतील सोन्याचे दागिन्यांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाहीत. तर संकाळी ०६ वाजेच्या सुमारास गांवातील ज्ञानेश्वर खेमराज राठोड हा त्यांच्या घरा जवळ असलेल्या कपाशीच्या शेतात शौचालयास गेला असता, त्यास सदर शेतात आमचे घरातील स्टीलचे डबे व पत्री पेटी तसेच दागिन्याचे रिकामे बॉक्स रिकामी कापडी पिशवी दिसुन आल्याने त्याने त्याबाबत कळविले. त्यामुळे सर्वांनी शेतात जाऊन पाहिले असता सदर शेतात ०२ स्टिल चे डबे, लहान लाल रंगाची पत्री पेटी व रिकामी कापडी पिशवी व दागिन्यांचे रिकामे बॉक्स दिसुन आल्याने , घरातील रुम मधील पत्री कोठीत ठेवलेल्या सोन्याचांदीचे दागिने व रोख रुपये घरात येवुन चोरी केल्याचे आमच्या लक्षात आले.

दहा लाखांच्या रोकडसह १५ लाखांचा मुद्देमाल लंपास
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

यात १० लाख रुपये रोख रुपये ,१ लाख २० रुपये किमतीचे नेकलेस, १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ५ सोन्याच्या अंगठ्या, ८४ हजार रु. कि.च्या ०२ सोन्याच्या चैन त्यापैकी एक चैन १५ ग्रॅम वजनाची व एक चैन १३ ग्रॅम वजनाची ०५४५,००० रु. कि.चे सोन्याचे पुतळी गाठले, ३६ हजारांचे २ कानातील सोन्याचे झुमके १२ ग्रॅम वजनाचे, ४५ हजारांंचे १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, ४८ हजार रु. कि. चे चांदिचे ०४ बामट्या, ६ हजार रुपये कि. चे चांदिचे ०२ कडे प्रत्येकि १० भार वजनाचे असा एकूण १५ लाख १९ हजार रुपये किमतीची मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला संदीप चैनसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com