‘स्टिंग ऑपरेशन’ षड्यंत्रासाठी 10 कोटींची डिल !

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा गौप्यस्फोट
‘स्टिंग ऑपरेशन’ षड्यंत्रासाठी 10 कोटींची डिल !

चेतन साखरे । जळगाव jalgaon

विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांच्या कार्यालयात झालेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’ षड्यंत्रासाठी (‘Sting Operation’ conspiracy) 10 कोटी रूपयांची डील झाल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे (Former Minister Eknathrao Khadse) यांनी आज ‘दै. देशदूत’शी बोलतांना केला. दरम्यान माझा संबंध नसतांना यात माझे नाव घेतले गेले. सत्ता नसल्यामुळे विरोधक अस्वस्थ असल्याचा टोलाही खडसे यांनी लगावला.

भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन (Former Minister Girish Mahajan) यांना मकोका लावण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात षड्यंत्र रचल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’ पेनड्राइव्हच्या माध्यमातुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब टाकला होता. या बॉम्बनंतर आघाडीत अस्वस्थता पसरली होती. दरम्यान विशेष सरकारी वकील यांच्या कार्यालयात झालेले ‘स्टिंग ऑपरेशन’ (‘Sting Operation’.) हे तेजस मोरे नामक युवकाकडुन षड्यंत्र रचुन झाल्याचा आरोप प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांनी केला आहे. तेजस मोरे हा जळगावचा असल्याचेही त्यांनी आरोपात म्हटले आहे. खडसेंच्या नावाचा उल्लेख असलेल्या प्रकरणासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला.

काय म्हणाले खडसे?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Former Minister Eknathrao Khadse) यांनी सांगितले की, तेजस मोरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहे. त्याला प्रवीण चव्हाण यांनी जामीनावर सोडविला होता. तेव्हापासून हा मोरे त्यांच्याकडे असायचा. ही माहिती मिळाल्यानंतर महाजन, सुनील झंवरचा मुलगा सुरज झंवर आणि गृपने तेजस मोरेशी संपर्क साधुन या षड्यंत्रासाठी (Conspiracy) पैसे कबुल केले. त्यानुसार त्याने एक घड्याळ आणून अ‍ॅड. चव्हाण यांना भेट दिले. ते घड्याळ अ‍ॅड. चव्हाण यांच्या कार्यालयात समोर लावण्यात आले. यासाठी तेजस मोरे आणि त्याच्या गृपने 10 कोटी रूपये घेतल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. यासाठी दोन बैठका देखिल झाल्याची धक्कदायक माहिती त्यांनी खडसे यांनी दिली. अ‍ॅड. चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशनसाठी (‘Sting Operation’) रचलेल्या या षड्यंत्राची चौकशीची मागणी केली असल्याचेही ते म्हणाले.

रात्री-बेरात्री नाथाभाऊच दिसतो

षड्यंत्र रचण्यासाठी यांना रात्री-बेरात्री नाथाभाऊच दिसतो. मनीष भंगाळेला (Manish Bhangale) देखिल फडणवीस यांनीच आणले होते. सत्ता नसल्याने ते अस्वस्थ आहे. सत्ता मिळण्यासाठी ते काहीही करायला तयार असल्याचे खडसे यांनी सांगितले. भूखंडप्रकरणी (Plots) मला फसविले. खासगी भूखंड असतांना तो घेतल्याने माझ्यामागे ईडी लावली. विविध षड्यंत्राच्या माध्यमातुन सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. सत्तेसाठी फडणवीस अधीर झाल्याचाही टोला एकनाथराव खडसे यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com