दहावीच्या परीक्षेला १ हजार २९७ विद्यार्थ्यांची दांडी

मराठीच्या पेपरला भरारी पथकाची कारवाई शून्य
दहावीच्या परीक्षेला १ हजार २९७ विद्यार्थ्यांची दांडी

जळगाव jalgaon

जिल्ह्यातील ७६१ केंद्रांवर दहावीची परीक्षा (tenth Examination) दि. १५ मार्चपासून सुरुवात झाली असून ५३ हजार ५१० विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार २१३ विद्यार्थ्यांनी (students) परीक्षा दिली आहे. तर १ हजार २९७ विद्यार्थी अनुपस्थित होते. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान (Copy-free campaigns) राबविण्यासाठी फिरते ७ भरारी पथक व परीक्षा केंद्रावर बैठे पथक नियुक्त करुनही एकही कारवाई न झाल्याने कॉपीमुक्त अभियानाचा (Copy-free campaigns) फज्जा उडाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याभरात शाळा तेथे परीक्षा केंद्र अशी व्यवस्था विद्यालयस्तरावर असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना (students) सोयी ठरले आहे. दि. १५ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाली असून आज पहिलाच मायमराठीचा विषय असल्याने शहरी भागासह ग्रामीण स्तरावर परीक्षा केंद्राबाहेर बंदोबस्त तर परीक्षा केंद्रात एक ते दीड तासानंतर कॉप्यांचा (Copy) सुळसुळाट झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, गैरमार्गाचा अवलंब करणार्‍यांवर भरारी पथकांकडून (Bharari squads) एकही कारवाई न करता खाली हात परतले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com