जि.प., पं.स. पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

जि.प., पं.स. पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्हा परिषद (Z.P) आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा (election campaign) थंडावल्या . आता गुप्त पध्दतीने दोन दिवस प्रचार सुरु राहिल. 5 ऑक्टोबर रोजी मतदान तर 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी (Counting of votes) होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 15 गटांसाठी आणि धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या चारही पंचायत समितीच्या 30 गणांसाठी पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे.

या पोटनिवडणूकीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जाहीर प्रचार सुरु होता. यात बैठका, सभा घेण्यात आल्या. तसेच रॅलीही काढण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा धुराळा उडाला. आज जाहीर प्रचार थंडावणार आहे. तर दोन दिवस मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात येणार आहे.

आज प्रचाराचा धुराळा थंडावल्यानंतर विविध पक्षांनी लावलेले बॅनर्स, फलक, झेंडे काढण्यात येतील. जे पक्ष आचारसंहितेचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. तर 6 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. मतदान व मतमोजणी प्रक्रियेची प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. त्यासाठी कर्मचारी व अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.