जि. प. अध्यक्षा आश्विनी पाटील म्हणतात.... जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द

जि. प. अध्यक्षा आश्विनी पाटील म्हणतात.... जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्हाच्या सर्वांगीण विकासासाठी (overall development of the district) कटीबध्द (committed) आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.आश्विनी पाटील (President Ms. Ashwini Patil) यांनी केले.

प्रभाग क्र.1 व भोकर ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.आश्विनी पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.सुभाष भामरे हे होते. भाजपाचे संजय शर्मा, प्रा.अरविंद जाधव , जिल्हा परिषद सदस्या सोनी कदम, माजी कृषी सभापती संग्राम पाटील,गटनेते रितेश परदेशी, माजी महापौर कल्पना महाले, सुनिल महाले, नगरसेवक नरेश चौधरी, वंदना भामरे, रंगराव ठाकरे, माजी सरपंच अशोक धडू देवरे, रतिलाल पाटील, कुणाल पाटील, रामभाऊ गंगाराम पाटील, भटू धडू देवरे, अरुण धडू देवरे, भानुदास देवरे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा आश्विनी पाटील म्हणाल्या की, मी जिल्हाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द आहे. सर्व विषय समित्यांचा आढावा घेतला आहे. येणार्‍या काळामध्ये सामान्य जनतेसाठी, शेतकर्‍यांसाठी, कामगारांसाठी, सार्वजनिक आरोग्यासाठी व शिक्षणासाठी उपयोग करुन जिल्हाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले.

खा. डॉ.सुभाष भामरे म्हणाले की, जिल्हा परिषदेचा निधी कमी पडेल त्यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकाच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाईल असे त्यांनी सांगितले.

आश्वासन खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंचायत समिती गटनेते रितेश परदेशी यांनी केले. विजय देवरे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com