जि.प.अधिकार्‍यांची विखरण शाळेला भेट

जि.प.अधिकार्‍यांची विखरण शाळेला भेट

बोराडी Boradi । वार्ताहर

जिल्हा परिषद (Zilla Parishad) येथील बांधकाम विभागाचे (Chief Executive Officer) मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या पथकाने विखरण येथील साने गुरुजी सेमी प्रायमरी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळेला (Visited the school) भेट दिली.

बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश ठाकूर यांनी आपल्या टीमसह शाळेतील भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार योजना, विद्यार्थी लाभच्या योजना, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शालेय रेकॉर्ड अध्यापनाचे नियोजन, सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी, कोविड लसीकरण आदीबाबत तपासणी करत आढावा घेतला. तसेच विद्यार्थी उपस्थिती बद्दल माहिती घेतली.

शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम, वृक्षारोपण, सर्व सोयींनी अद्यावत असलेला डिजिटल रूमची पाहणी केली. इयत्ता दहावीच्या मुलींनी परिपाठ छान सादर केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डिजिटल वर्गाची माहिती विद्यालयाचे उपशिक्षक एस.एस.डोळे व सचिन विखरणकर यांनी दिली.

यावेळी पथकासोबत पंचायत समिती शिरपूरचे शिक्षण विस्तार अधिकारी एफ.के गायकवाड उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एम.सनेर यांनी अधिकार्‍यांकडून वृक्षारोपण करून घेतले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्रीमती के.एस. ईशी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन विखरणकर यांनी केले.

अधिकार्‍यांनी साने गुरुजी माध्यमिक विद्यालय व जि.प.मराठी केंद्र शाळा यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com