भ्रष्टाचार निर्मूलनासाठी युवकांनी संकल्प करावा

मनजीतसिंह चव्हाण : एसपीडीएम महाविद्यालयात उद्बोधन वर्ग
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी युवकांनी संकल्प करावा

बोराडी Boradi । वार्ताहर

शासकीय किंवा इतर गैर शासकीय कामांसाठी विशिष्ट प्रकारची कागदपत्रे (Documents) आवश्यक असतात. ते कागदपत्रे देणारा एखादा शासकीय कर्मचारी (Government employees) लाच मागत (Asking for a bribe) असेल किंवा कोणी भ्रष्टाचार (Corruption) करण्यासाठी मदत करत असेल, तर ते असंविधानिक कृत्य (Unconstitutional act) ठरते. अशा संविधानिक कृत्य करणारा दोषी ठरतो.त्यामुळे देशाचे भविष्य उज्जवल करण्यासाठी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी (eradicate corruption) युवकांनी संकल्प (youth resolved) करावा, असे मत धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक (Anti Bribery Office) कार्यालयातील पोलीस निरीक्षक मनजीतसिंह चव्हाण (Anti Bribery Office Police Inspector Manjit Singh Chavan) यांनी व्यक्त केले.

शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे, एस. पी. डी. एम. महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत भ्रष्टाचार निर्मूलन तथा लाच लुचपत प्रतिबंधक कायदा जन जागरण कार्यक्रमांतर्गत पोलीस निरीक्षक मनजीतसिंह चव्हाण बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील, उपप्राचार्य प्रा. पी.जी.पारधी, डॉ.सी.एम.पावरा, प्रा. व्ही.बी.चौधरी, हेड कॉन्स्टेबल शरद काटके, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पावरा, रामदास बारेला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थी दशेत असतांना ऍडमिशन प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयातून विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. अशी कागदपत्रे मिळवण्यासाठी लाच न देण्याचा संकल्प आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायदा त्याचे स्वरूप याबाबत सविस्तर चर्चा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी केली. ते म्हणाले लाच घेणे जसा गुन्हा ठरतो, तसाच लाच देणे हा देखील गुन्हा ठरतो. म्हणून अशा कायदेशीर मार्गाचा अवलंब विद्यार्थ्यांनी स्वतःतर करूच नये. परंतु इतरांनाही न करण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन केले.

यावेळी प्राचार्य डॉ.व्ही.एम. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.एस.बी.गिरासे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रमेश पावरा, प्रा.प्रदीप पाटील, शिक्षकेतर कर्मचारी शरद चौधरी, कैलास गोसावी, संजय पवार आदींनी सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com