तरुणींची छेडछाड करणाऱ्याची कारागृहात रवानगी

तरुणींची छेडछाड करणाऱ्याची कारागृहात रवानगी

धुळे - तिनिधी dhule

शहरातील विष्णु नगर भागात तरुणींची छेडछाड करणारा इसमास न्यायालयाच्या आदेशाने सी.आर.पी.सी.१५१(३) अन्वये कार्यवाहीत १२ दिवस जिल्हा कारागृहात जेरबंद करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे महिला वर्गाने स्वागत केले आहे.

देवपुर भागातील विष्णु नगर परिसरात राहणारा बजरंग जगन्नाथ बर्वे हा विष्णूनगर परिसरात राहणाऱ्या तरुणीची छेडछाड करुन तिचा पाठलाग करणे, तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करणे, असा छळ करीत होता. त्याविरुध्द भादंवि कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. मात्र त्याला न्यायालयाने जामीनावर खुले केले. त्यानंतर पुन्हा त्याने तरुणीच्या घरासमोर उभे राहुन घराकडे एक टक लावुन पाहुन तिचा छळ करणे सुरु केले.

याबाबत आरोपीविरुध्द भागातील तरुणी व महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दिला. समस्या समजुन घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे आरोपीतास सी.आर.पी.सी.१५१(१) अन्वये दि २९ ऑक्टोबर रोजी अटक केली. आरोपी हा बाहेर राहील्यास त्याच्या हातुन अती गंभीर स्वरुपाचा गुन्हा होण्याची दाट शक्यता असून आरोपी हा कोणाचेही काही ऐकुण घेण्यास तयार नसल्याने, त्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने तसेच दिपावली सणानिमित्त विष्णु नगर भागात आरोपी हा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची दाट शक्यता असल्याने व तक्रारदार तरुणी व तिच्या परिवाराच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी आरोपीला सी.आर.पी.सी.१५१(३) अन्वये पाचवे न्यायालय धुळे न्यायालयात १५ दिवस स्थानबध्द करण्याबाबत लेखी रिपोर्ट व चौकशी कागदपत्रासह न्यायालयात हजर केले.

त्यानुसार न्यायालयाने आरोपीतास दि.१० नोव्हेंबरपर्यंत स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. आरोपी बजरंग बर्वे याची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय येरुळे, असई राजेश इंदवे, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पोना कचवे, पोना शशिकांत देवरे, पोकॉ मुकेश वाघ, शिंदे, किरण सावळे, पाटील, चौधरी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com