तरुणाई करतेय सोल्यूशन ट्यूबपासून नशा

दोंडाईचातील चित्र; पालकांसह पोलिसांनी लक्ष देण्याची गरज
तरुणाई करतेय सोल्यूशन ट्यूबपासून नशा

समाधान ठाकरे

दोंडाईचा (Dondaicha)

वाळू, गांजा, भांग, गुटखा तस्करीमुळे दोंडाईचा शहराचे नाव सर्वदूर पोहचले असतांना आता तरुणाईचे आयुष्य (life of youth) उद्धवस्त करण्याचा व्यसनाचा (Addiction) भयंकर प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्यात कुत्ता गोळीचा (Dog pill) साठा मिळून आल्याचे उदाहरण ताजे असतांनाच आता दोंडाईचा शहरात नशा (Intoxication) भागवण्यासाठी चक्क पंच्चर काढण्याचा ट्यूब,(Puncture removal tube) फेव्हिक्विक (faviquic) याचा सर्रास वापर (Use) केला जात आहे. त्यामुळे आपला पाल्य कुठल्या नशेच्या आहारी तर गेला नाही ना, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

खरे तर तरुणाई आपल्या देशाची संपत्ती आहे. पण या संपत्तीलाच आता कीड लागण्याचा प्रकार घडत आहेत. गरीब घरचा मुलगा असो की मध्यमवर्गीय वा सधन वर्गातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला दिसत आहे. व्यसन हे तरुणाईचे स्टाईल, स्टेटमेंट बनत चालले आहे. मात्र तेच व्यसन त्याच्या आयुष्यात अंधार करणारे ठरत आहे. विशेष म्हणजे शहरी भागात हे लोण दिसून येत आहे.

पंच्चर काढण्याच्या ट्यूबचा गोड नशा- गांजा, भांग, दारू, गुटखा हे नशेचे प्रकार सर्व दुर असले तरी दोंडाईच्यात मात्र चक्क फेविक्वीक, पंच्चर ट्यूब यांची नशा तरुण वर्गाकडून केली जात असल्याचे हादरवणारे वृत्त आहे. शहरी भागातील काही तरुणाई नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे.

पंच्चर ट्यूब, फेविक्वीक हे कापडात टाकून ते हाताने घासून तो कापड तोंडाला लावून जोरात आत पोटात श्वास घेतला जातो. या श्वासाद्वारे नशेची किक मिळत असल्याचा पंच्चर ट्यूबची नशा करणार्‍या तरुणाने सांगून दाखविले. विशेष म्हणजे गांजा व अन्य तत्सम नशाकारक वस्तु महाग असल्याने अनेक गरीब तरुणांना घेणे परवडत नाही. पण दहा, वीस, तीस रूपयाला मिळणारे पंच्चर ट्यूब, फेविक्वीक विकत घेतले की झाली नशा, या नशेचा अंमल तरूणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरी भागात ही नशा आली कुठून?- विशेष म्हणजे नशेचा हा प्रकार शहरी भागात आला कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक तरूण या जीवघेण्या नशेच्या आहारी गेले असून वारंवार या प्रकारची नशा करीत असल्याने ते वेगळ्याच जगात वावरत असल्याचे दिसून येते. याकडे पालकांसह पोलिस प्रशासनाने देखील लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता

सायकल मार्ट, किराणा दुकान, जनरल स्टोअर्समधून पंच्चर ट्यूब, फेविक्वीक सर्रास विक्रीसाठी ठेवल्या जात आहे. ते कोणास द्यावे याचे निर्बंध नसल्याने तरूण सहजतेने मिळवितात. मात्र ही नशा एवढी गंभीर आहे की, एकदा व्यसन लागले की ते सहजा सहजी सुटत नाही. नशा केली नाही तर ती व्यक्ती बैचेन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या काही दिवसापासून हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com