धुळ्यात तलवारीसह तरूण ताब्यात

धुळ्यात तलवारीसह तरूण ताब्यात

धुळे । प्रतिनिधी dhule

दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार बाळणार्‍या एकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. रितेश धारू पवार (वय 29 रा. प्लॉट नं. 116, भाईजी नगर, चक्करबर्डी रोड, धुळे) असे त्याचे नाव आहे.

तो बेकायदशीरपणे तलवार बाळगून असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास छापा टाकत त्याला त्यांच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजार रूपये किंमतीची 24 इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्यांच्यावर पोना प्रशांत चौधरी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकाँ जे.एम.पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com