लळींग धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

मालेगावहून लग्न समारंभात आलेल्या युवकावर काळाचा घाला
लळींग धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

धुळे । Dhule । प्रतिनिधी

मालेगाव (Malegaon) येथून धुळ्यात लग्न समारंभासाठी (wedding ceremony) आलेल्या युवकाचा (youth) लळींग धबधबा (Laling waterFalls) येथे पाण्यात बुडून (Death by drowning) मृत्यू झाला. याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इस्त्राईल शफीक शेख (वय18) रा. जाफरनगर मालेगाव असे मयत युवकाचे नाव आहे. इस्त्राईल हा दि. 15 ऑक्टोबर रोजी मालेगाव येथील जाफरनगरातील तरुणाचा धुळ्यात विवाह असल्याने त्यानिमित्त तो धुळ्यात आला होता. लग्न समारंभ आटोपल्यानंतर त्याच्या मित्रांसोबत मोटार सायकलीने लळींग किल्ला येथील लांडोर बंगला येथील धबधबा येथे आला होता. परंतू धबधब्याच्या पाण्यात बुडून इस्त्राईलचा मृत्यू झाला.

पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. सतिष कुटे यांनी तपासून इस्त्राईला मयत घोषीत केले. याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक उपनिरिक्षक अशोक पायमोडे हे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com