लाटीपाडा धरणात युवकाची आत्महत्या

आई-वडिलाचे भांडण होत असल्याच्या रागातून
लाटीपाडा धरणात युवकाची आत्महत्या

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

आई-वडिलांचे भांडण (Parental quarrel) होत असल्याच्या रागातून (Out of anger) युवकाने लाटीपाडा धरणात (Latipada dam) उडी घेवून आत्महत्या (suicide) केली. हितेश तामखाने Hitesh Tamkhane (वय 17) असे मृत युवकाचे नाव आहे.

आई-वडिल यांचे नेहमी भांडण होत असल्याचा रागातून मुलगा हितेश दत्तू तमखाने हा दि. 29 रोजी रात्री 8.30 वाजता घरातून निघून गेला. बराच उशीर होऊन देखील तो घरी परतला नाही, या संदर्भात त्याचे वडील दत्तू तमखाने यांनी मिसिंग दाखल केली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता सकाळी लाटीपाडा धरणावर एक मोटार सायकल, मोबाईल, चष्मा, सोन्याची अंगठी उजव्या कालव्याच्या गेटजवळ मिळून आली.

हे सर्व साहित्य हितेशचे असल्याचे माहिती मिळाली. सदर मोटार सायकल (क्र. एम एच18- 5118) ही रात्री 8.30 वाजेच्या सुमारास धरणाकडे आली व पहाटे 6 वाजता मासे पकडण्यासाठी येणार्‍या व्यक्तींना ही मोटार सायकल सकाळपासून येथेच आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. हितेशने पाण्यात उडी घेतली असावी यासाठी शोध मोहीम सुरू झाली. दुपारी मालेगाव येथील खाजगी शोध बचाव पथक दाखल होऊन शोध सुरू झाला.

सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील, अप्पर तहसीलदार विनायक थविल, सपोनि सचिन साळुंखे यांनी लाटीपाडा येथे भेट दिली. पथकाला 7.15 वाजता हितेशचा शिर नसलेला मृतदेह उजव्या कालव्याच्या पाण्यात मिळून आल्याने त्याला पाण्यातून काढण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके व पोलीस पथक, बचाव कार्य घटनास्थळी मदत कार्य सुरू होते.

हितेशने बारावी उत्तीर्ण झाला होता व सीईटीची परीक्षा देखिल त्याने दिली होती,हितेश एकुलता एक मुलगा होता.

Related Stories

No stories found.