शिरपूरात पिस्टलसह तरूणाला अटक

शिरपूरात पिस्टलसह तरूणाला अटक

धुळे । Dhule। प्रतिनिधी

बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्टल (Indigenous pistols) बळगणार्‍या तरूणाला (youth ) शिरपूर शहर पोलिसांची (Shirpur city police) पाठलाग (Chase) करत शिताफीने पकडले. (Caught) त्यांच्याकडून पिस्टल 50 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील आमोदे येथून एक जण बेकायदेशीरपणे पिस्टल घेवून जात असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने काल रात्री आमोदेतील निळकंठेश्वर महादेव मंदिरासमोर सापळा लावला. साडेअकरा वाजेच्या सुमारास एक तरूण संशयीतरित्या दुचाकीवर जातांना दिसला. मात्र त्याला पोलिस असल्याचा संशय आल्याने त्याने पळ काढला.

पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडले. चौकशीत त्याने हर्षल भिका माळी (वय 23 रा. रामसिंग नगर, शिरपूर) असे त्याचे नाव सांगितले. त्याच्याजवळ देशी बनावटीचे एक पिस्टल मॅग्झीनसह मिळून आले. 20 हजारांचे पिस्टल व 30 हजारांची दुचाकी असा एकुण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमित रनमळे यांच्या फिर्यादीवरून हर्षल माळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, सपोनि गणेश फड, पोहेकॉ ललित पाटील, लादुराम चौधरी, पोकॉ विनोद अखडमल, प्रविण गोसावी, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, मुकेश पावरा, अनिल अहिरे, उमेश पवार, स्वप्निल बांगर, अमित रनमळे, नरेंद्र शिंदे, प्रविण गोसावी यांनी ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com