धुळ्यात भरदिवसा पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

धुळ्यात भरदिवसा पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

धुळे । प्रतिनिधी - dhule

शहरातील दसैरा मैदानजवळ भरदिवसा गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी सापळा रचून पकडले. पिस्टलसह दोन जीवंत काडतुसे असा 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिवाळीत गंभीर गुन्हा अथवा खरेदी विक्रीच्या उद्देशाने त्याने पिस्टल बाळगले असावे. त्याच्याकडे पिस्टल कुठून आले याचा पोलिस शोध घेत आहे.

दिवाळी सणाच्यानिमित्त शहरातील जनतेच्या सुरक्षित्तेसाठी आणि जनतेला निर्भयपणे सण साजरे करता यावे, यासाठी पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना अवैध शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

काल पीआय देशमुख यांना अवैध शस्त्राबाबत गुप्त माहिती मिळाली की लक्ष्मीवाडी, रेल्वे क्रॉसींग जवळ शासाकिय दुधडेअरी रोड येथे राहणार्‍या शुभम सुनिल पुंड (वय २४) या तरुणाकडे गावठी पिस्टल असून तो काहीतरी गुन्हा करु शकतो. त्यानुसार पीआय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने दसैरा मैदानजवळ असलेल्या आशिर्वाद व्यापारी संकुला समोर रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचत शुभम पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल व दोन जीवंत काडतुसे आढळून आली.

२६ हजार रुपये किंमतीची शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय नितीन देशमुख आणि शोध पथकाचे पोहेकॉ विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, पोकॉ निलेश पोतदार, प्रविण पाटील, मनिष सोनगिरे, तुषार मोरे, शाकीर शेख, अविनाश कराड, यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com