बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी तरूणाला 5 वर्ष सक्त कारावास

कापडण्यातील घटना, न्यायालयाचा निकाल
बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी तरूणाला 5 वर्ष सक्त कारावास

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील कापडणे येथे लग्नसोहळ्यासाठी (wedding) कुटुंबियांसोबत आलेल्या बालिकेवर (girls) लैंगिक अत्याचार (Sexual abuse) करणार्‍या तरूणाला (youth) न्यायालयाने (court) पाच वर्ष (Five years) सक्त कारावास (rigorous imprisonment) व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा (Punishment) दिली आहे. हा निकाल विशेष न्यायाधीश तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलेश उगले यांनी दिला आहे.

धुळे येथे राहणारी पिडीत नऊ वर्षीय बालिका (girls) दि. 26 जानेवारी 2016 रोजी सकाळी आठ वाजता दोन भाऊ व पालकांसह नातेवाईकांकडे लग्नासाठी (wedding) कापडणे येथे गेली होती. लग्नानंतर जेवण झाल्यावर आरोपी समाधान राजेंद्र माळी (Accused Samadhan Rajendra Mali) (वय 22 रा.इंदिरानगर, कापडणे) याने पिडीत मुलीस मंडपाजवळच असलेल्या बंद घरी भूलथापा देवून घराचे कुलूप उघडून आत नेले. तेथे त्याने पिडीत मुलीवर अत्याचार (Tyranny) केले.

याबाबत सोनगीर पोलीस (police) ठाण्यात आरोपीविरुध्द भादंवि कलम 354 (अ) (1) व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला विशेष न्यायाधीश शैलेश आर. उगले यांच्या न्यायालयात (court) चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची न्यायालयासमोर झालेली महत्वपूर्ण साक्ष गृहित धरुन आरोपी समाधान राजेंद्र माळी यास भादंवि कलम 354 (1) व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 8, 10, 12 अन्वये दोषी ठरविण्यात आले. त्यानुसार त्याला पाच वर्ष सक्त कारावास व 10 हजार रुपये दंड म्हणून मुळ तक्रारदार हिस अदा करणे, दंड न भरल्यास तीन महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

खटल्यात सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्त अ‍ॅड. निलेश कलाल व विशेष शासकीय अभियोक्ता अ‍ॅड.अजय सानप यांनी कामकाज पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.