पांझरा नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरूणाचा मृत्यू

पांझरा नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरूणाचा मृत्यू

धुळे Dhule। प्रतिनिधी

धुळे येथे पांझरा नदीला (Panjra river) आलेल्या पुरात (floods) आज सकाळी देवपूर परिसरातील तरूण (Young man) वाहुन गेला.काही अंतरावर त्याचा मृतदेह (dies) आढळून आला. रवि पवार (Ravi Pawar) असे त्या तरूणाचे नाव आहे.

मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीला यावर्षी पहिल्यांदाच पूर आला आहे. पांझरा दुथडी भरून वाहत असून पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीवरील फरशीपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. फरशी पुलावरून पाणी वाहत आहे. या वाहत्या पाण्यात कोणीही उतरू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरीही आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास छोट्या पुलाजवळ तीन तरूण पांझरेच्या पात्रात पोहण्यासाठी उतरल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी पाहिले. शहरातील पांचाळवाड्यातील रहिवाशी रवि पवार हा तरूण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मोठ्या पुलापर्यंत वाहतांना काही जणांना दिसला, मात्र नंतर तो बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यात आला. एकविरा देवी मंदिराच्या पुलानजीक रविचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Related Stories

No stories found.