शिरपूरात तरुणाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

शिरपूरात तरुणाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शिरपूर शहरातील (Shirpur city) रामसिंग नगर येथे गावठी कट्ट्यातून (Gavthi Katta) तरुणाने डोक्यात (Young man) गोळी झाडून (shooting himself) आत्महत्या (suicide) केली. काल रात्री 11 वाजेच्या सुुमारास ही घटना घडली. हर्षल भिका माळी (वय24) असे मयत तरुणाचे नाव आहे.

हर्षलचे कुटुंबासोबत किरकोळ वाद झाला होता. या वादातून त्याने रात्री 11 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गावठी कट्ट्यातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यात तो जखमी झाला. त्याला त्याचे वडील भिका माळी यांनी उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

परंतू डोक्यातून रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविले. परंतू उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com