परीक्षेत एक गुण कमी मिळल्याने तरूणाची आत्महत्या

परीक्षेत एक गुण कमी मिळल्याने तरूणाची आत्महत्या

सोनगीर Songir । वार्ताहर

स्पर्धा परीक्षेत (Competitive exams) एका मार्काने अपयश (one mark less)आल्याने नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. किशोर भटू जाधव (Kishore Bhatu Jadhav) (वय 28) (रा. वाघाडी खुर्द. ता. शिंदखेडा ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

औरंगाबाद येथे परीक्षेचा सराव करीत होता तेथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी समोर आली. आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न अधूरेच राहिले.

क्लास एक अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेसाठी सराव करत असतांना नुकताच स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एका गुणानेे यादीत नाव नसल्याच्या नैराश्यातून किशोर जाधव याने औरंगाबाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द येथील किशोर भटू जाधव हा तरुण दोन वर्षे धुळे येथे तर चार वर्षांपासून औरंगाबाद येथे असे गेल्या सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षासाठी सराव करीत होता. वडील भटू हरी जाधव हे वाघाडी खुर्द गृप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्याचा व्यवसाय शेती आहे. त्यांना तीन मुले आहेत.

नुकताच स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एक मार्काने यादीत नाव हुकल्याने नैराश्यातून किशोर जाधव याने औरंगाबाद येथे बाबा पेट्रोल पंप जवळील वसाहतीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 30 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी समोर आली. वाघाडी खुर्द येथे वडीलांना फोनवरून माहीती मिळाल्याने आई वडिलांनी हंबरडा फोडला. अधिकारी बनण्याचे स्वप्न अधूरेच राहिले. किशोरचे शवविच्छेदन औरंगाबाद येथे करुन गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाघाडीखुर्द येथे आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान किशोरने आई वडिलांना फोन केला. मला स्पर्धा परीक्षांमध्ये कमी मार्क मिळाले असून अपयश आल्याची खंत व्यक्त केली.

किशोरची शेवटची भेट

सात सप्टेंबरला भाऊ विकास याचा मुलाचा पुणे येथे वाढदिवस साजरा केला. तेथे चार दिवस आई वडील मोठा भाऊ, वहिनी, पुतण्या असे कुटुंब एकत्र राहिले. तोच सहवास परीवाराला शेवटचा ठरला..

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com